'लागीर झालं जी' मालिकेतील शीतलीच्या 'सुमन काकी'चा हा अंदाज कधी पाहिला आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 10:48 IST2017-10-12T05:16:03+5:302017-10-12T10:48:26+5:30
छोट्या पड्यावरील लागिर झालं जी ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. दिवसेंदिवस मालिकेतील कथा अधिकाधिक रंजक बनत चालली ...

'लागीर झालं जी' मालिकेतील शीतलीच्या 'सुमन काकी'चा हा अंदाज कधी पाहिला आहे का?
छ ट्या पड्यावरील लागिर झालं जी ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. दिवसेंदिवस मालिकेतील कथा अधिकाधिक रंजक बनत चालली आहे. फौजीच्या जीवनावरील आधारित या मालिकेत अजिंक्य आणि शीतल यांची लव्हस्टोरीसुद्धा कशी खुलते हे रसिकांना पाहायला मिळत आहे. मालिकेतील अजिंक्य आणि शीतल ही जोडी रसिकांना चांगलीच भावते आहे. मात्र याशिवाय मालिकेतील इतर कलाकारसुद्धा तितकेच लोकप्रिय झाले आहेत. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा वेगळी असून त्या त्या व्यक्तीरेखेचं विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच अजिंक्य आणि शीतलसह ही पात्रंसुद्धा घराघरात पोहचली आहेत.यांत अजिंक्यचा मित्र राहुल्या, विक्या, त्याचे मामा-मामी, जिजी, जयडी रसिकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. याशिवाय शीतलच्या घरातील मंडळीही तितकेच रसिकांचे लाडके ठरले आहेत. शीतलच्या घरातील सदस्यांमध्ये नाना, आई, आप्पा, काका, दोन काकी दाखवण्यात आल्यात. शीतलच्या दोन काकींमध्ये एक सुमन काकी आणि दुस-या नीलम काकी आहेत. या दोन काकींपैकी शीतलच्या प्रत्येक गोष्टीत साथ देणारी, तिला समजून घेणारी काकी म्हणजे सुमन काकी आहे. त्यामुळे मालिकेत शीतल तिच्याकडे आपल्या ब-याच गोष्टी शेअर करते असं पाहायला मिळते. शीतलच्या रिल सुमन काकीची भूमिका अभिनेत्री शिवानी घाटगे हिने साकारली आहे. शीतलला समूजन घेणारी सुमन काकी घरच्या घरी ब्युटीपार्लर चालवते. गावातील महिलांचा मेकअप आणि फेशियल सुमन काकी करते असं मालिकेत दाखवण्यात आलं आहे. मालिकेत दुस-यांचा मेकअप करणारी, त्यांना स्टायलिश बनवणारी सुमन काकी रिअल लाइफमध्येसुद्धा स्टायलिश आहे. शिवानी घाटगे हिचा एक फोटो समोर आला असून तिची स्टायलिश अदा या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. लागिर झालं जी मालिकेत बहुतांशी साडीमध्ये वावरणारी सुमन काकी म्हणजेच शिवानी घाटगे हिचा या फोटोत वेगळा अंदाज पाहायला मिळतो आहे. मालिकेत इतरांच्या फॅशन आणि लूक्सची काळजी घेणारी सुमन काकी म्हणजेच शिवानी घाटगे प्रत्यक्षात रिअल लाइफमध्येही स्टायलिश असल्याचं या फोटोवरुन पाहायला मिळत आहे. शीतलीला मदत करणारी सुमन काकी आधीच रसिकांना भावली आहे. त्यातच तिचा हा रिअल लाइफ स्टायलिश अंदाज पाहून सुमन काकी म्हणजेच शिवानी घाटगे हिच्या चाहत्यांमध्ये वाढ होणार हे मात्र नक्की !