​हर्षद दिसणार आता या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 15:18 IST2016-11-10T15:18:27+5:302016-11-10T15:18:27+5:30

देहलिज, बेइन्तिहा यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेला अभिनेता हर्षद अरोरा प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हर्षदने आतापर्यंत सगळ्याच मालिकांमध्ये ...

Harshad will appear in this role now | ​हर्षद दिसणार आता या भूमिकेत

​हर्षद दिसणार आता या भूमिकेत

हलिज, बेइन्तिहा यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेला अभिनेता हर्षद अरोरा प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हर्षदने आतापर्यंत सगळ्याच मालिकांमध्ये रोमँटिक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. पण त्याला नेहमीच काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. त्यामुळे आता तो सुपर कॉप व्हर्सेस सुपर व्हिलन्स या मालिकेत एक वेगळी भूमिका साकारताना दिसणार आहे. 
सुपर कॉप व्हर्सेस सुपर व्हिलन्स ही मालिका गेली कित्येक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत शक्ती आनंद, अशोक समर्थ प्रमुख भूमिकेत होते. त्यांच्या आधी अमन वर्मा, आमिर दळवी, मिलिंद गुणाजी यांनीदेखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. पण आता प्रेक्षकांना ही मालिका एका नव्या ढंगात पाहायला मिळणार आहे आणि आता हर्षद या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. या मालिकेविषयी हर्षद सांगतो, "मी आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये रॉमँटिक भूमिका साकारल्या आहेत. मला स्वतःला कित्येक दिवसांपासून काहीतरी वेगळे करायचे होते. एखाद्या वेगळ्या पण चांगल्या भूमिकेच्या मी शोधात होतो. त्यावेळी मला या मालिकेची ऑफर आली. काहीतरी वेगळे करायला मिळतेय या हेतून मी ही मालिका स्वीकारली. या मालिकेत मी पृथ्वी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. सध्या ठरावीक भागांच्या मालिकांचा ट्रेंड आला आहे आणि हीदेखील ठरावीक भागांची मालिका असल्याने प्रेक्षकांना ही आवडेल अशी मला आशा आहे. मालिका या ठरावीक भागांच्या असल्या की कथानकाला कोणती वळणे देण्यात येणार तसेच व्यक्तिरेखेत काय बदल घडणार याची कल्पना कलाकारांना आधीच असते. याचा फायदा त्यांना अभिनय करताना नक्कीच होतो."

Web Title: Harshad will appear in this role now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.