'तुझ्यात जीव रंगला' पाठकबाई आणि राणादाचा व्हेकेशन मोड, अक्षया-हार्दिकचा परदेशात रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 12:39 PM2023-04-14T12:39:31+5:302023-04-14T12:46:15+5:30

अक्षया आणि हार्दिक जोशी सध्या दोघे परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करतायेत. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झालेत.

Hardik joshi akshaya deodhar romantic vacation photo viral on instagram | 'तुझ्यात जीव रंगला' पाठकबाई आणि राणादाचा व्हेकेशन मोड, अक्षया-हार्दिकचा परदेशात रोमान्स

'तुझ्यात जीव रंगला' पाठकबाई आणि राणादाचा व्हेकेशन मोड, अक्षया-हार्दिकचा परदेशात रोमान्स

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपलपैकी एक कपल म्हणजे हार्दीक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar). तुझ्यात जीव रंगला मालिकेतून राणादा आणि पाठकबाईंच्या भूमिकेतून हार्दिक आणि अक्षयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. हे रिल लाइफ कपल रिअल आयुष्यातही एक झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्न सोहळ्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. दरम्यान आता दोघे परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करतायेत. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झालेत.

अक्षया देवधर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता तिने इंस्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हार्दिक आणि अक्षयाने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हॅकेशन दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये दोघे रोमाँटिक अंदाजात दिसतायेत. 

 अक्षया देवधर सध्या कोणत्या मालिकेत काम करताना दिसत नाही. तर हार्दिक जोशी सन मराठी वाहिनीवरील सुंदरी मालिकेत सध्या पाहायला मिळतो आहे. अक्षया आणि हार्दिकचे चाहते त्या दोघांना पुन्हा एकदा एकत्र काम करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Web Title: Hardik joshi akshaya deodhar romantic vacation photo viral on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.