वहिनीसाठी हार्दिकनं स्वीकारला 'जाऊ बाई गावात' शो, म्हणाला - 'पहिला एपिसोड पाहायला ती जगात नव्हती...'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 12:47 PM2023-12-18T12:47:18+5:302023-12-18T12:47:46+5:30

Hardik Joshi : झी मराठीवर नुकताच जाऊ बाई गावात हा नवीन शो दाखल झाला आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या शोचं सूत्रसंचालन अभिनेता हार्दिक जोशी करत आहे.

Hardik accepted 'Jau Bai Gavat' show for his sister-in-law, said - 'She was not in the world to watch the first episode...' | वहिनीसाठी हार्दिकनं स्वीकारला 'जाऊ बाई गावात' शो, म्हणाला - 'पहिला एपिसोड पाहायला ती जगात नव्हती...'

वहिनीसाठी हार्दिकनं स्वीकारला 'जाऊ बाई गावात' शो, म्हणाला - 'पहिला एपिसोड पाहायला ती जगात नव्हती...'

झी मराठीवर नुकताच 'जाऊ बाई गावात' (Jau Bai Gavat Show) हा नवीन शो दाखल झाला आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या शोमध्ये ऐशो आरामात जगलेल्या मुली स्पर्धक म्हणून दाखल झाल्या आहेत, ज्या गावात जाऊन तिथली संस्कृती आणि नवीन गोष्टी शिकणार आहेत. यादरम्यान त्या वेगवेगळ्या टास्कचा सामनादेखील करणार आहेत. या शोचं सूत्रसंचालन अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) करत आहे. नुकतेच त्याने मुलाखतीत या शोबद्दल आणि त्याने हा शो स्वीकारण्यामागचं कारण सांगितलं. तो हा शो नाकारणार होता. मात्र त्याच्या वहिनीसाठी त्याने हा शो स्वीकारल्याचे मुलाखतीत हार्दीकने सांगितले.

हार्दिक जोशीच्या वहिनीचं काही दिवसांपूर्वी निधन झाले. याबद्दल त्यानेच पोस्ट शेअर करत सांगितले होते. आता त्याने मुलाखतीत वहिनीमुळे त्याने शो स्वीकारल्याचे सांगितले. तो म्हणाला की, माझ्यासाठी हा शो माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे. माझी वाहिनी खूप आजारी होती आणि मी या शोमधून आपले पाऊल मागे घेत होतो. पण जेव्हा माझ्या वाहिनीला समजले की मी 'जाऊ बाई गावातला' नकार द्यायला जात होतो, तेव्हा हॉस्पिटलमध्ये तिने तिच्या हातात माझा हात घेतला आणि माझ्याकडून वचन घेतले की हा शो तू सोडायचा नाही. कारण तिला माहिती आहे की मी कामातून कधी माघार घेत नाही, तर तिझ म्हणणे होते की जी गोष्ट आजपर्यंत नाही केली ती यापुढे ही करायची नाही. 


हा शो मी फक्त तिच्यामुळे करतोय आणि योगायोग असा की 'जाऊ बाई गावात'चा पहिला एपिसोड तिच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसारित झाला. पण मला नेहमी खंत राहील की कार्यक्रमाचा पहिला एपिसोड बघायला ती या दुनियेत नव्हती. मी माझ्या प्रत्येक दिवसाची सुरूवात तिला नमस्कार करून करतो, असे हार्दिकने मुलाखतीत सांगितले.
    

 

Web Title: Hardik accepted 'Jau Bai Gavat' show for his sister-in-law, said - 'She was not in the world to watch the first episode...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.