'सोढी'च्या ऑनस्क्रीन पत्नीला गुरुचरणच्या बेपत्ता होण्याची काळजी! म्हणाली, "तो खूप धार्मिक म्हणून.."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 11:24 AM2024-04-27T11:24:21+5:302024-04-27T11:24:54+5:30

गुरुचरणची ऑनस्क्रीन पत्नी जेनिफर मिस्त्रीने त्याच्या गायब होण्यावर काय म्हणाली बघा. (gurucharan singh, jenifer mistry)

gurucharan singh on screen wife jenifer mistry talk about gurucharan missing news | 'सोढी'च्या ऑनस्क्रीन पत्नीला गुरुचरणच्या बेपत्ता होण्याची काळजी! म्हणाली, "तो खूप धार्मिक म्हणून.."

'सोढी'च्या ऑनस्क्रीन पत्नीला गुरुचरणच्या बेपत्ता होण्याची काळजी! म्हणाली, "तो खूप धार्मिक म्हणून.."

काल सर्वांना एका बातमीने मोठा धक्का बसला. ती म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रोशन सिंग सोढी म्हणजेच अभिनेता गुरुचरण सिंग विमानतळावरुन बेपत्ता झाला. त्याच्या वडिलांनी याविषयी तक्रार नोंदवली. गुरुचरणच्या बेपत्ता होण्यावर अनेक कलाकार प्रतिक्रिया देत आहेत. अशातच 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील गुरुचरणची ऑनस्क्रीन पत्नी रोशन म्हणजेच अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने याविषयी तिची प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 

जेनिफरने काळजी व्यक्त करुन म्हटलंय की, "हे खूपच धक्कादायक आहे. मी फक्त आशा आणि प्रार्थना करते की तो सुरक्षित असेल. मी फक्त प्रार्थना करेन की त्याचं गायब होणं हा फक्त एक गैरसमज असेल आणि तो सुरक्षित असेल. तो एक अतिशय अध्यात्मिक आणि चांगला माणूस आहे. गेल्या जूनपासून मी त्याच्याशी संपर्कात नाही.  आम्ही एकमेकांशी बोललो नाही. आम्ही आधी संपर्कात होतो. तारक मेहताचे 4000 भाग पूर्ण केल्याबद्दल त्यांनी फेब्रुवारीमध्ये मला अभिनंदनाचा संदेश पाठवला होता. त्याव्यतिरिक्त आम्ही एकमेकांच्या संपर्कात नव्हतो."

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. तारक मेहता मालिकेत गुरुचरण सोढी ही पंजाबी भूमिका साकारत होता. गेल्या ४ दिवसांपासून गुरूचरणचा काहीच पत्ता नसल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसांत तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. गुरूचरण दिल्लीहूनमुंबईला येण्यासाठी निघाला होता. मात्र तो मुंबईत पोहचलाच नाही. गेल्या २ दिवसांपासून त्याचा फोनही बंद असल्याचं समोर आलं आहे. 

 

Web Title: gurucharan singh on screen wife jenifer mistry talk about gurucharan missing news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.