​गुरमीत चौधरीने देबिना बॅनर्जीला दिले हे गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2017 06:45 AM2017-04-03T06:45:57+5:302017-04-03T12:15:57+5:30

देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांची भेट रामायण या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ते दोघे ...

Guremit Choudhury gave Debinah Banerjee a gift | ​गुरमीत चौधरीने देबिना बॅनर्जीला दिले हे गिफ्ट

​गुरमीत चौधरीने देबिना बॅनर्जीला दिले हे गिफ्ट

googlenewsNext
बिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांची भेट रामायण या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी 2011मध्ये ते दोघे लग्नबंधनात अडकले असे आपण अनेक वर्षांपासून ऐकत आले आहोत. पण हे चुकीचे असून रामायण या मालिकेच्या आधीपासूनच गुरमीत आणि देबिना एकमेकांना ओळखत होते आणि इंडस्ट्रीत यायच्या आधीच त्या दोघांनी गुपचूप लग्न केले होते अशी कबुली नुकतीच गुरमीतने दिली आहे. त्यामुळे या दोघांच्या लव्ह स्टोरीत सगळ्यांना रस निर्माण झाला आहे.
गुरमीत आणि देबिना हे छोट्या पडद्यावरचे एक क्युट कपल मानले जाते. ते दोघे चित्रीकरणात कितीही व्यग्र असले तरी अधिकाधिक वेळ एकमेकांना देतात. देबिनाचा 18 एप्रिलला वाढदिवस असून या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी गुरमीतने कित्येक दिवस आधीच सुरू केली आहे. गुरमीतने देबिनाच्या वाढदिवसासाठी एक छान गिफ्ट घेतले आहेत. त्याने मनालीपासून जवळच असलेल्या एका गावात जागा घेतली असून तो तिथे लवकरच घर बांधणार आहे. 
गुरमीत आणि देबिना काही वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशला फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांना ते राज्य खूप आवडले होते. पृथ्वीवरील सर्वात छान जागांपैकी ती एक जागा आहे असे देबिनाचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना वेळ मिळाला तर ते नेहमीच हिमाचलला जातात. आपण हिमाचलमध्ये एखादे घर घ्यावे असे कित्येक दिवसांपासून देबिना आणि गुरमीतच्या डोक्यात सुरू आहे. त्यामुळे देबीनाच्या वाढदिवसाच्या आधी गुरमितने तिच्यासाठी मनालीत एक जागा घेतली आहे आणि त्या जागेवर लवकरात लवकर तो एक खूप सुंदर घर बांधणार आहे. 



Web Title: Guremit Choudhury gave Debinah Banerjee a gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.