​गुलराज सिंग सरगममध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 13:56 IST2017-05-02T08:26:49+5:302017-05-02T13:56:49+5:30

गुलराज सिंग यांनी एकापेक्षा एक दर्जेदार गाणी चित्रपटसृष्टीला दिली आहेत. उत्कृष्ट संगीतकाराच्या यादीत त्यांचे नाव आज आवर्जुन घेतले जाते. ...

In Gulraj Singh Sargam | ​गुलराज सिंग सरगममध्ये

​गुलराज सिंग सरगममध्ये

लराज सिंग यांनी एकापेक्षा एक दर्जेदार गाणी चित्रपटसृष्टीला दिली आहेत. उत्कृष्ट संगीतकाराच्या यादीत त्यांचे नाव आज आवर्जुन घेतले जाते. सरगम या कार्यक्रमात प्रेक्षकांना त्यांच्या गीतांचा आस्वाद घेता येणार आहे. 
लहानपणापासूनच गुलजार यांना संगीताची आवड होती. संगीत क्षेत्रात कारकिर्द करण्यासाठी त्यांना त्यांच्या घरच्यांकडून पूर्णपणे पाठिंबा मिळाला. ए. आर. रहमान यांच्या रोजाचे संगीत त्यांना प्रचंड आवडले आणि याच गीतांकडून प्रेरणा घेऊन गुलराज यांनी संगीत क्षेत्रात प्रवेश केला. शंकर एहसान लॉय या संगीतकारांकडे आपली कला सादर करण्याची त्यांना संधी मिळाली आणि मग मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. ए. आर. रहमान यांच्यासोबतदेखील त्यांनी काम केले. हिंदी इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध गाणी आज त्यांच्या नावावर आहेत. उंगली सिनेमातील पाकिजा हे गाणेदेखील सरगमच्या भागात सादर केले जाणार आहे. 
तसेच सरगमच्या या खास भागात आपल्याला वादळ वारा, स्वर सले, ना दिले, जिवा शिवाची बैल जोडी, दिल की तपीश, वल्लव वल्लव, वारे वारे, मोगरा फुलला, गोंधळ अशी मराठी मातीतील अनेक गाणी ऐकायला मिळणार आहेत. महालक्ष्मी अय्यर, अभिजीत सावंत या गायकांनी ही संगीतमय सरगम सजणार आहे.
सरगम या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी उर्मिला कानेटकर कोठारेने उचलली आहे तर आदिनाथ कोठारे या कार्यक्रमाचा क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निर्माता आहे. या कार्यक्रमाचे शीर्षक गीत शंकर महादेवन यांनी गायले असून मंदार चोळकर याने ते लिहिले आहे आणि सिद्धार्थ आणि सौमिल यांनी ते संगीतबद्ध केले आहे. 

Web Title: In Gulraj Singh Sargam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.