डान्स महाराष्ट्र डान्समध्ये गुलाबजाम चित्रपटाची टीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 11:54 IST2018-03-23T06:24:27+5:302018-03-23T11:54:27+5:30

धमाकेदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर करून झी युवावरील लोकप्रिय डान्स रिऍलिटी शो डान्स महाराष्ट्र डान्स प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. ...

Gulabjam film team in Dance Maharashtra Dance | डान्स महाराष्ट्र डान्समध्ये गुलाबजाम चित्रपटाची टीम

डान्स महाराष्ट्र डान्समध्ये गुलाबजाम चित्रपटाची टीम

ाकेदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर करून झी युवावरील लोकप्रिय डान्स रिऍलिटी शो डान्स महाराष्ट्र डान्स प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. झी युवाववरील डान्स महाराष्ट्र डान्स हा कार्यक्रम प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या व्यासपीठावर सध्या अनेक सिनेकलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.  सुपरहिट मराठी सिनेमा - गुलाबजामचे कलाकार, सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर झी युवा वरील डान्स महाराष्ट्र डान्समध्ये येणार आहेत हे कळाल्यावर सर्वांच्या आनंदाला सीमा राहिली नव्हती. जेन नेक्स्ट अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि होस्ट सुव्रत जोशी यांच्या कॉमिक टायमिंगने सर्वांचे खळखळून हसवले. स्पर्धकां सोबत डान्सकरण्यापासून ते त्यांना प्रोत्साहन देण्यापर्यंत, सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकरने डान्स महाराष्ट्र डान्सच्या सेटवर खूप मजा केली.

या आठवड्यात प्रेक्षकांना डान्स महाराष्ट्र डान्समध्ये भव्यता पहायला आणि अनुभवायला मिळणार आहे कारण स्पर्धक मोठ्या प्रॉप्सचा वापर करून परफॉर्म करणार आहेत. सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर सेलिब्रिटी जज म्हणून या आठवड्यात येणार असल्यामुळे स्पर्धकांसाठी अनेक सरप्राइज असणार आहेत. सोनाली आणि सिद्धार्थच्या आधी त्यांच्या What’s up लग्नच्या प्रमोशनसाठी आले होते. याआधी महिला दिनही डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर साजरा करण्यात आला होता.  

 डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमातील स्पर्धकांना कोणत्याही डान्स प्रकारचे कसलेही बंधन नाहीये. यात एखादा डान्सर सोलो किंवा ग्रुपमध्ये, मुख्य म्हणजे विविध नृत्यशैली लोकांसमोर आणू शकतो. आजपर्यंत कोणत्याही वाहिनीने या प्रकारचा खुला मंच डान्सरसाठी उपलब्ध करून दिला नाही आणि हेच डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाचे वेगळेपण आहे. 

Web Title: Gulabjam film team in Dance Maharashtra Dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.