'भाभीजी घर पर है' च्या सेटवर गोविंदा का पडला आजारी? जाणून घ्या याची कारणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 15:24 IST2016-11-04T15:22:59+5:302016-11-04T15:24:56+5:30
सिनेमांच्या प्रमोशनसाठी कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी हजेरी लावत सिनेमाचे प्रमोशन कण्यात बिझी असतात.धावपळीच्या कामकाजामुळे त्यांच्या तब्येतीवरही परिणाम होतो.असाच प्रकार घडला ...

'भाभीजी घर पर है' च्या सेटवर गोविंदा का पडला आजारी? जाणून घ्या याची कारणं
स नेमांच्या प्रमोशनसाठी कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी हजेरी लावत सिनेमाचे प्रमोशन कण्यात बिझी असतात.धावपळीच्या कामकाजामुळे त्यांच्या तब्येतीवरही परिणाम होतो.असाच प्रकार घडला गोविंदावर. 'भाभीजी घर पर है' शनिवार स्पेशल भागासाठी ते सेटवर पोहचले. गोविंदाचा आगामी सिनेमा 'आ गया हिरो' सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी गोविंदा सेटवर पोहचताच तो आजारी पडला आणि मालिकेचे शूट काही वेळेसाठी थांबवावे लागले. 3 तास सेटवर आराम केल्यानंतर गोविंदाने या भागाचे शूटींग पूर्ण केले.शूटिंग दरम्यान त्याच्या कडून कुठेही कमी राहिलेली नाहीय ना ? यासाठी तो प्रत्येक सीनचे शूट झाल्यानंतर मॉनिटरवर त्याच्या सीन्सची पाहणीही करत होता.अपेक्षित वेळे पेक्षाही शूटिंग लांबल्यानंतरही कलाकारांनी आनंदात शूटिंग पूर्ण केले. गोविंदाला बरे नाही असे कुठेही त्याच्याबरोबर काम करतांना जाणवले नाही. आराम करता करता त्यांनी आमच्यासोबत गप्पाही मारल्या. उलट आम्ही या भागाचे शूटिंग एंन्जॉय केलं. शूटिंग दरम्यान वेळेतच शूटिंग संपण्यापेक्षा चांगले काम कसे होईल याकडेच आमचा कटाक्ष असतो असेही कलाकारांनी सांगितले. नेहमी रसिकांचे मनोरंजन कसे करता येईल याच्या प्रयत्नात मालिकेची टीम असते. यासाठी मालिकेने एक खास भाग प्रसारित करण्याचे ठरवले आहे.
![]()
सध्या छोट्या पडद्यावर वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्याचनुसार 'भाभीजी घर पर है' या मालिकेतही एक अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. एक दिवस विस्तारित करत एक नवीन शो दर शनिवारी रसिकांना पाहायला मिळणार आहे.'भाभीजी घर पर है शनिवार स्पेशल' भागात बॉलिवूड कलाकार कानपूर मोहल्लाला भेट देत रसिकांचे मनोरंजन करताना दिसती.