सोशल मीडियापासून लांबच राहाणे चांगले - बरून सोबती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2017 13:29 IST2017-05-31T07:59:33+5:302017-05-31T13:29:33+5:30

सोशल मीडियाचा अती वापर होत असल्याचे लोकप्रिय टीव्ही कलाकार बरून सोबतीला वाटते.त्याने पहिल्या दिवसापासून मालिकेच्या प्रसिध्दीसाठी सोशल मीडियापासून चार ...

Good to stay away from social media - Barun Sobati | सोशल मीडियापासून लांबच राहाणे चांगले - बरून सोबती

सोशल मीडियापासून लांबच राहाणे चांगले - बरून सोबती

शल मीडियाचा अती वापर होत असल्याचे लोकप्रिय टीव्ही कलाकार बरून सोबतीला वाटते.त्याने पहिल्या दिवसापासून मालिकेच्या प्रसिध्दीसाठी सोशल मीडियापासून चार हात लांब राहणेच पसंत केले आहे. फेसबुक, ट्विटर,इन्स्टाग्राम वगैरे सोशल मीडिया माध्यमांवर आपली छबी कशी दिसते, याबद्दल बरून नेहमीच दक्षता घेत आला आहे.बरून ‘इस प्यार को क्या नाम दूँ-3’ या मालिकेद्वारे टीव्ही मालिकांमध्ये जवळपास 5 वर्षांनी कमबॅक करतो आहे. कोणीही येत मनाला वाटेल ते बोलून जातं सध्या असेच काही सोशल मीडियावर पाहायला मिळतं. सोशल मीडिया वापरणे हे ही एक जबाबदारीने वापरले पाहिजे याचे कोणाला भाण असल्याचे जाणवत नाही.त्यामुळे व्हर्च्यअल दुनियेपासून दूर असते असे  बरून सोबती सांगतो. बरूनचा चाहता वर्गही खूप मोठा असून त्याचे चाहते हे फक्त  भारतातच नाही तर परदेशातही आहेत. असे काय घडले की तून सोशल मीडियापासून दूर राहतोस या प्रश्नावर बरून म्हणाला, “तुम्ही सोशल मीडियावर असणं ही फार ताकदवान गोष्ट असून ही ताकद कशी वापरायची, हे फार महत्त्वाचं आहे. या मीडियावर काहीही भाष्य करताना तुम्हाला शब्द फार जपून वापरावे लागतात; कारण शेवटी त्यांची जबाबदारी तुमच्यावरच येते. हो, मी माझं व्यावसायिक आयुष्य आणि वैयक्तिक जीवन यांच्यात एक सीमारेषा आखली आहे. मी एक सेलिब्रिटी असलो म्हणून काय झालं? माझ्या जीवनाच्या ज्या गोष्टीची माहिती माझ्या चाहत्यांना हवी आहे, ती त्यांच्यापुढे ठेवलेलीच आहे.पण माझ्या आयुष्याचा दुसरा भाग हे माझं वैयक्तिक, खाजगी आयुष्य आहे. ते जगासाठी नाही. सोशल मीडियावर आल्यावर मला माझ्या या वैयक्तिक जीवनाची माहिती उघड करावी लागेल, जे मला आवडणार नाही.” बरून ट्विटरवर 2016 पर्यंत सक्रिय होता, पण नंतर त्याने तेही अकाऊंट बंद केले.

Web Title: Good to stay away from social media - Barun Sobati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.