GOOD NEWS करण मेहराच्या घरी हलणार पाळणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 18:16 IST2016-12-26T14:12:21+5:302016-12-26T18:16:48+5:30

''घर एक नन्हा सा मेहमान आने वाला है'  हेच सूर सध्या निशा आणि करण मेहराच्या घरी गुंजतायत. कारण लवकरच ...

GOOD NEWS Crocodile moving to Karan Mehra's house | GOOD NEWS करण मेहराच्या घरी हलणार पाळणा

GOOD NEWS करण मेहराच्या घरी हलणार पाळणा

'
;'घर एक नन्हा सा मेहमान आने वाला है'  हेच सूर सध्या निशा आणि करण मेहराच्या घरी गुंजतायत. कारण लवकरच या दोघांच्या जीवनात एक नवा पाहुणा येणार आहे. एक गोंडस बाळ या दोघांच्या आयुष्यात येणार आहे. निशा लवकरच एका बाळाला जन्म देणार आहे.त्यामुळे करण मेहरासुद्धा निशाची काळजी घेताना पाहायला मिळतो आहे. निशा आणि करण यांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. चार वर्षांनंतर मेहरा कुटुंबीयांच्या घरी आनंदाचे वातावरण पसरलं आहे. कुणी तरी येणार येणार गं या गाण्याच्या ओळीप्रमाणे सा-यांनाच नव्या पाहुण्याची प्रतीक्षा लागली आहे. ये रिश्ता क्या कहेलाता है या मालिकेत करण मेहराने साकारलेली नैतिक ही पित्याची भूमिका गाजली होती. रसिकांच्या मनात त्याने अढळ स्थान मिळवले होते. आता ऑनस्क्रीन पिता साकारणार करण आता रिअल पापा बनणार आहे. एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार करण निशासह एका हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्यावेळी निशाचे बेबी बम्प पाहायला मिळाल्याचा दावा या दैनिकाने केला आहे.

'हंसते हंसते' या अभिनेता जिमी शेरगिलच्या 2008 साली सिनेमा दरम्यान करण आणि निशाची भेट झाली. या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.एकमेंकांमध्ये चांगले ट्युनिंग जमल्यानंतर कुटुंबीयांच्या संमतीने ते रेशीमगाठीत अडकले.करण आणि निशाची जोडी 'नच बलिये' या डान्स रियालिटी शोमध्येही पाहायला मिळाली. 2012 आणि 2013 या दोन्ही सीझनमध्ये या जोडीने रसिकांची मने जिंकली.'आनेवाला पल' या दूरदर्शनवरील मालिकेत निशा रावल हिच्या अभिनयाची झलक रसिकांना पाहायला मिळाली. तसेच 'हंसते हंसते' आणि 'रफू-चक्कर' या सिनेमातही तिने काम केले आहे. मात्र 'मैं लक्ष्मी तेरे आंगण की' या मालिकेत साकारलेल्या सौम्या या भूमिकेने निशाला नवी ओळख मिळवून दिली. तिच्या भूमिकेला रसिकांची विशेष दाद मिळाली. करण मेहराची छोट्या पडद्यावरील कारकिर्द सुपरहिट ठरली आहे. 'ये रिश्ता क्या केहलाता है' या मालिकेला रसिकांनी अक्षरक्षा डोक्यावर घेतले.याच मालिकेमुळे करण प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच्या नक्ष या भूमिकेने रसिकांच्या मनावर गारुड घातले होते. नुकतेच बिग बॉस सीझन 10मध्येही करण मेहरानं स्पर्धक म्हणून घरात एंट्री मारली होती.

Web Title: GOOD NEWS Crocodile moving to Karan Mehra's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.