चंकी पांडेच्या फॅन्ससाठी खुशखबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 16:30 IST2017-11-07T11:00:20+5:302017-11-07T16:30:20+5:30
चंकी पांडेने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो त्याच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो. गोविंदा सोबतचे त्याचे अनेक ...
चंकी पांडेच्या फॅन्ससाठी खुशखबर
च की पांडेने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो त्याच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो. गोविंदा सोबतचे त्याचे अनेक चित्रपट हिट ठरले आहेत. चंकी पांडे गेल्या काही वर्षांपासून चित्रपटात खूप कमी काम करताना आपल्याला दिसत आहे. हाऊसफुल या चित्रपटातील त्याच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. चंकी पांडेने अनेक वर्षं चित्रपटात काम केले असले तरी तो कधीच आपल्याला छोट्या पडद्यावर पाहायला मिळाला नाही.
चंकी पांडे अनेक वर्षं बॉलिवूड मध्ये असल्याने त्याच्या अभिनयावर अनेक जण फिदा आहेत. त्याच्या फॅन्सची संख्या प्रचंड आहे. त्याच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. चंकी पांडे प्रेक्षकांना आता छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात लवकरच त्याची एंट्री होणार आहे. या कार्यक्रमात मल्लिका दुआ, झाकित खान आणि हुसैन दलाल प्रेक्षकांना परीक्षकाच्या भूमिकेत दिसत होते. पण हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून या कार्यक्रमाला म्हणावा तितका टिआरपी मिळालेला नव्हता. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या या आधीच्या सगळ्या सिझनना प्रेक्षकांना खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिझनने राजू श्रीवास्तव, कपिल शर्मा, एहसान कुरेशी यांसारखे विनोदवीर इंडस्ट्रीला मिळून दिले आहेत. पण द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनला तितकासा टिआरपी मिळत नसल्याने या कार्यक्रमात आता काही बदल करण्यात आले. या कार्यक्रमात सध्या श्रेयस तळपदे आणि साजिद खान परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत. यानंतर आता या कार्यक्रमात आणखी एक बदल होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एली अव्रराम करते. पण तिचे हिंदी अतिशय अशुद्ध असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आता तिच्यासोबत चंकी पांडे देखील आपल्याला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
साजिद खान, श्रेयस तळपदे, चंकी पांडे आणि अक्षय कुमार यांची खऱ्या आयुष्यात खूप चांगली मैत्री असल्याने त्यांची ही केमिस्ट्री प्रेक्षकांना द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात देखील पाहायला मिळणार आहे.
Also Read : या अभिनेत्रीने MeToo हा हॅशटॅग वापरून सांगितले की, सातव्या वर्षी झाले होते माझे लैंगिक शोषण