बिग बॉसमधून गिझेल बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 14:24 IST2016-01-16T01:07:47+5:302016-02-04T14:24:33+5:30
बिग बॉसच्या घरातून मॉडेल गिझेल ठकराल बाहेर झाली आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळविणार्या गिझेलला सर्वांत कमी वोट्स मिळाले. मागील ...

बिग बॉसमधून गिझेल बाहेर
ब ग बॉसच्या घरातून मॉडेल गिझेल ठकराल बाहेर झाली आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळविणार्या गिझेलला सर्वांत कमी वोट्स मिळाले. मागील आठवड्यात शाहरुख खान बिग बॉस-9 मध्ये सामील झाल्यामुळे कुणाचेही अँल्मिनेशन करण्यात आले नव्हते, त्यामुळे बिग बॉसच्या घरातून यावेळी कोण बाहेर पडणार याची उत्सुकता लागली होती. सलमानच्या शोमध्ये सिंगल सिन देखील मिळाला तरी तो मी क रेल. गिझेल तीन आठवड्यापूर्वी वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवित बिग बॉसच्या घरात दाखल झाली होती. बिग बॉसच्या घराचा अनुभव शेअर करताना म्हणाली, घराच्या आतील अनुभव खूप चांगला होता, मला येथे अधिकाधिक वेळ राहयचे होते. म्हणूनच मी निराश आहे. मी लवकरच बाहेर आले हे वाईट झाले. बिग बॉसमध्ये किश्वर खूप सेल्फिश आहे. मात्र या घरात राहणारा चांगला मध्यस्त कोण असा प्रश्न विचारल्यावर तिने वृषभ सिन्हाचे नाव घेतले. मी बिग बॉसच्या घरात सर्वांत मिसळले होते. मी जखमी झाल्यावर मदानाने माझी खूप काळजी घेतली. मला वाटते आम्हा सर्वांची 'कूल गँग' तयार झाली होती. तशी पाहिले तर ही कूल गँग क्रुअल गँग होती.
गिझेलने 'वेलकम-2'मध्ये काम केले असून आता ती 'क्या कूल है हम'मध्ये दिसणार आहे.
गिझेलने 'वेलकम-2'मध्ये काम केले असून आता ती 'क्या कूल है हम'मध्ये दिसणार आहे.