लग्नाच्या 5 वर्षानंतर आई-बाबा होणार अभिनेता गौतम रोडे आणि अभिनेत्री पंखुरी, क्युट व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 12:33 PM2023-04-07T12:33:02+5:302023-04-07T12:38:50+5:30

टीव्हीवरील क्युट कपल गौतम रोडे(Gautam Rode )आणि पंखुरी अवस्थी(Pankhuri Awasthy) यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे.

Gautam rode pakhuri awasthy announce pregnancy with a beautiful video showing their journey fans shower love | लग्नाच्या 5 वर्षानंतर आई-बाबा होणार अभिनेता गौतम रोडे आणि अभिनेत्री पंखुरी, क्युट व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज

लग्नाच्या 5 वर्षानंतर आई-बाबा होणार अभिनेता गौतम रोडे आणि अभिनेत्री पंखुरी, क्युट व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज

googlenewsNext

टीव्हीवरील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेल्या गौतम रोडे(Gautam Rode )आणि पंखुरी अवस्थी(Pankhuri Awasthy) यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. पंखुरी अवस्थी लवकरच आई होणार आहे. या जोडप्याने नुकतीच सोशल मीडियावर प्रेग्नन्सीची घोषणा केली. गौतम रोडे आणि पंखुरी अवस्थी यांनी चाहत्यांशी आनंदाची बातमी शेअर केली आणि सांगितले की आता त्यांचं कुटुंब मोठं होणार आहे. गौतम रोडे आणि पंखुरी यांनी गोड बातमी चाहत्यांसोबत अतिशय मनोरंजक पद्धतीने शेअर केली. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अॅनिमेशन फिल्मच्या माध्यमातून मांडला आहे.

व्हिडिओ खूपच क्यूट आहे, ज्यावर चाहत्यांनी आणि मित्रांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. व्हिडिओची सुरुवात एका क्लॅप बोर्डने होते ज्यात लिहिले होते- जब वी मेट, कलाकार- पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडे. या व्हिडिओमध्ये गौतम आणि पंखुरी यांच्या पहिल्या भेटीपासून ते लग्न आणि आता प्रेग्नेंन्सी पर्यंतचे महत्त्वाचे टप्पे अॅनिमेशनच्या माध्यमातून सुंदरपणे दाखवण्यात आले आहेत. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना गौतम रोडे आणि पंखुरी अवस्थीने लिहिले की, 'आमचे कुटुंब मोठे होते आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असू देत.

अनिता हसनंदानीपासून ते सरगुन मेहता, विवेक दहिया, अमित टंडन आणि गौहर खानपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी गौतम आणि पंखुरीला शुभेच्छा दिल्या आहेत. गौहर खानही लवकरच आई होणार आहे. गौतम आणि पंखुरी अवस्थी यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. लग्नाच्या पाच वर्षानंतर ते आई-बाबा होणार आहेत.

पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडे यांची पहिली भेट 'रजिया सुलतान' या टीव्ही शोच्या सेटवर झाली. 2015 मध्ये 'सूर्यपुत्र कर्ण' या टीव्ही शोच्या सेटवर दोघे पुन्हा भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. फेब्रुवारी 2018 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.

Web Title: Gautam rode pakhuri awasthy announce pregnancy with a beautiful video showing their journey fans shower love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.