'या' लोकप्रिय अभिनेत्याला रंग ओळखताच येत नाहीत, दुर्मिळ आजाराबद्दल स्व:ताच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:30 IST2025-08-25T16:24:19+5:302025-08-25T16:30:50+5:30

कोण आहे हा लोकप्रिय अभिनेता?

Gaurav Khanna reveals Color Blindness Bigg Boss 19 Know Everything About Anupamaa Actor Celebrity Masterchef Winner Bigg Boss 19 Contestant | 'या' लोकप्रिय अभिनेत्याला रंग ओळखताच येत नाहीत, दुर्मिळ आजाराबद्दल स्व:ताच केला खुलासा

'या' लोकप्रिय अभिनेत्याला रंग ओळखताच येत नाहीत, दुर्मिळ आजाराबद्दल स्व:ताच केला खुलासा

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस १९' नुकताच सुरू झाला आहे. प्रीमियरमध्ये एका स्पर्धकाने मोठा खुलासा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 'अनुपमा' मालिकेतील अभिनेता गौरव खन्ना याने आपण एका दुर्मिळ आजाराने त्रस्त असल्याचं सांगितलं. गौरवने खुलासा केला की त्याला रंगांमध्ये फरक ओळखता येत नाही, म्हणजेच त्याला 'रंगांधळेपणा' (Color Blindness) हा आजार आहे. या आजारामुळे दैनंदिन जीवनात त्याला अनेक अडचणी येतात.

सलमान खानशी संवाद साधताना त्यानं या आजाराबद्दल सांगितलं. टिव्हीच्या या लाडक्या अभिनेत्याला ग्रीन फ्लॅग म्हणून ओळखलं जातं. पण, त्याला स्व:ता रंगामधील फरक ओळखता येत नाही. स्टेजवर त्याच्याशी संवाद साधताना सलमान खानने गौरवला हिरवा आणि लाल रंगाचा झेंडा दाखवला. त्यावेळी गौरवने सांगितले की त्याला रंगांमधला फरक दिसत नाही. गौरवनं सांगितलं की, त्याला वाहतूक सिग्नलमधील (traffic signal) दिवे आणि कपड्यांचे रंग ओळखण्यातही अडचण येते. गौरवच्या हा खुलासा केल्यानंतर हा आजार नेमका काय आहे, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.


 

रंगांधळेपणा म्हणजे काय?
आपल्या डोळ्यांमध्ये रंग ओळखणाऱ्या शंकू पेशी असतात त्यांना कोन सेल्स असं म्हटलं जातं. त्या लाल, हिरवा किंवा निळ्या रंगातला भेद ओळखण्यासाठी उपयोगी असतात. रंगांधळेपण असणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांतील शंकू पेशी योग्यप्रकारे काम करत नसतात. काही रुग्णांमध्ये त्यांची संख्या कमी असते तर काही रुग्णांमध्ये त्या आजिबात नसतात. बऱ्याच रुग्णांना लाल, हिरवा, तपकिरी आणि भगव्या रंगातील भेद करता येत नाही.

हा आजार बहुतेक वेळा अनुवांशिक असतो आणि पिढ्यानपिढ्या कुटुंबात पुढे जातो. मात्र, काही वेळा मधुमेह, अल्झायमर किंवा इतर आजारांमुळे, तसेच काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे देखील हा आजार होऊ शकतो. सध्या रंगांधळेपणावर कोणताही कायमस्वरूपी उपचार उपलब्ध नाही. मात्र, काही विशेष प्रकारचे चष्मे किंवा कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्यास रंगांमध्ये फरक ओळखण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते. डोळ्यांसंबंधी कोणतीही समस्या असल्यास घरगुती उपचार करण्याऐवजी नेत्ररोग तज्ज्ञांचा (Ophthalmologist) सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Web Title: Gaurav Khanna reveals Color Blindness Bigg Boss 19 Know Everything About Anupamaa Actor Celebrity Masterchef Winner Bigg Boss 19 Contestant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.