बिग बॉसमध्ये गौरव चोपडा आणि मोनालिसाने केली एकत्र आंघोळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 11:27 IST2016-12-13T15:30:46+5:302016-12-14T11:27:53+5:30
आईच्या निधनामुळे अचानक घराबाहेर पडावे लागलेल्या मनू पंजाबीच्या अनुपस्थितीमुळे एकाकी राहत असलेली मोनालिसा आता पुन्हा एकदा गेममध्ये परतली आहे. त्यास कारणही तसेच आहे. बानीच्या स्वभावामुळे वैतागुण गेलेल्या गौरव चोपडाने मोनालिसाला जवळ केल्याने दोघांमधील नाते फुलायला लागले आहे. दोघांना दिलेल्या बाथ टबमधील टास्कनंतर तर हे नाते आणखीच बहरण्याची शक्यता आहे. मात्र सिक्रेट रूममध्ये असलेला मनू पंजाबी दोघांमधील गुलाबी नाते उघड्या डोळ्यांनी बघत असल्याने येत्या काळात मोनावरून गौरव आणि मनूमध्ये सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

#ManuPunjabi is upset with @monalisaantara & her growing fondness for @gauravchopraa!#BB10#Video reveals more! https://t.co/si7KVW5AkK
— Bigg Boss (@BiggBoss) December 13, 2016
सेलिब्रिटीच्या रांगेत असतानाही कॉमन मॅनच्या गटात स्वत:ला रमवून घेणाºया मोनालीसाचे शोच्या पहिल्या दिवसापासूनच मनूबरोबरचे संबंध जवळीकता निर्माण करणारे होते. दोघांमध्ये काही तरी शिजत असल्याचे घरातील अन्य सदस्यांना कळून चुकले. आईच्या निधनामुळे जेव्हा मनूला अचानकपणे घराबाहेर पडावे लागले तेव्हा मोनालिसाने अत्यावस्थ होत त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अनुपस्थितीत मोना जणू काही गेममधून बाहेरच पडली होती. ती टास्कमध्ये फारशी सहभागी न होता, मनूच्या विरहात एकाकी राहत होती.
परंतु नॉमिनेशन टास्कनंतर घरातील संबंधांनी एक वेगळेच वळण घेतल्याने ती पुन्हा एकदा गेममध्ये परतली आहे. आपल्या वैचारिक शैलीत आतापर्यंत गेमला आकार देणाºया गौरवने तिच्या एकाकीपणाला साथ देत तिच्यासोबत केमिस्ट्री जुळविण्याचा प्रयत्न केला. त्याचे झाले असे की, नॉमिनेशन टास्कमध्ये गेम प्लॅन करताना गौरवने बानीला नितीभाला नॉमिनेट करण्याचा सल्ला दिला. तसेच मी मोनालिसाला नॉमिनेट करणार, असेही सांगितले. ठरल्यानुसार बानीने नितीभाला नॉमिनेट केले, परंतु गौरवने मोनाला नॉमिनेट करण्यास नकार दिला. त्यावरून बानी आणि गौरवमध्ये वादही झाला.
गौरवच्या या निर्णयामुळे इम्प्रेस झालेल्या मोनाने त्याच्याशी जवळीकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गौरवदेखील बानीच्या स्वभावामुळे वैतागून गेला असल्याने त्याने लगेचच मोनाच्या मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारला. दोघेही रात्री उशिरापर्यंत अॅक्टिव्हिटी एरियात फिरताना एकमेकांचे कौतुक करीत होते. मात्र हा संपूर्ण प्रकार सिक्रेट रूममध्ये असलेले मनू आणि प्रियंका बघत होते. मोना गौरवशी फ्लर्ट करीत आहे, हे प्रियंका मनूला वारंवार सांगत होती. काही वेळानंतर मनूच्यादेखील विचारात बदल झाला, त्याने प्रियंकाच्या सांगण्यावर विश्वास ठेवत ‘गेममध्ये राहण्यासाठी मोना काहीही करू शकते’ असे म्हटले.
#BiggBoss gives #ManuPunjabi & #PriyankaJagga the power to make decisions about the housemates! #BB10@bani_jhttps://t.co/dKfJ06Ilfh
— Bigg Boss (@BiggBoss) December 13, 2016
मात्र ट्विस्ट तेव्हा आले जेव्हा बिग बॉसने एका टास्कदरम्यान घरातील सर्व सदस्यांच्या चाव्या मनू आणि प्रियंकाकडे दिल्या. एका टेबलच्या चहू बाजूने घरातील सर्व सदस्यांना बसवून त्यांना जज करण्याची जबाबदारी मनू आणि प्रियंकावर दिली. त्यानुसार बाथटबमध्ये गौरव आणि मोनालिसाला परफॉर्म करण्यास तुम्ही संमत आहात काय? असा प्रश्न बिग बॉसने विचारला. त्यावर प्रियंका आणि मनू दोघांचेही एकमत झाले.
त्यानुसार गौरव आणि मोनालिसाने बाथटबमध्ये परफॉर्म केले. यावेळी मोनालिसाने दाखविलेल्या अदा आणि त्याला गौरवची साथ मनूला धक्कादायक वाटली. तसेच घरातील सदस्यदेखील दोघांचा परफॉर्म बघून थक्क झाले. सर्वांच्याच मनात या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याची शंका निर्माण झाली. मनू पंजाबी तर हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत होती.
आता त्याने घरात प्रवेश केल्यानंतर मोनाची त्याच्याप्रती कशी प्रतिक्रिया असेल अन् त्यास मनू कशी दाद देईल, हे बघण्यासारखे असेल. आता तो घरात केव्हा प्रवेश करणार याचीच प्रेक्षकांना प्रतीक्षा लागली आहे.