​ब्रम्हराक्षसच्या कलाकारांचे गेट टुगेदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 15:18 IST2017-06-16T09:48:08+5:302017-06-16T15:18:08+5:30

ब्रम्हराक्षस ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या होत्या. या मालिकेची कथा खूपच ...

Gate Together of the Brahmarasakas artists | ​ब्रम्हराक्षसच्या कलाकारांचे गेट टुगेदर

​ब्रम्हराक्षसच्या कलाकारांचे गेट टुगेदर

रम्हराक्षस ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या होत्या. या मालिकेची कथा खूपच वेगळी होती. बालाजी टेलिफ्लिम्सच्या या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ही मालिका टिआरपीच्या रेसमध्ये देखील नेहमीच आघाडीवर होती. या मालिकेतील पराग त्यागी, किश्वर मर्चंट, रक्षंदा खान हे कलाकार प्रेक्षकांना खूपच आवडले होते. या मालिकेने जवळजवळ सहा-सात महिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पण गेल्या काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेचे फॅन्स या मालिकेला आणि या मालिकेतील कलाकारांना चांगलेच मिस करत आहेत. ही मालिका संपून आता तीन-चार महिने झाले आहेत. या मालिकेच्या काही कलाकारांनी नुकतेच गेट टुगेदर केले. 
या मालिकेतील रक्षंदा खान, कुणाल वोहरा, अहम शर्मा, क्रिस्टल डिसोझा यांनी नुकतेच छोटेसे गेटटुगेदर केले होते. याविषयी या मालिकेत वेद निगमची भूमिका साकारणारा कुणाल वोहरा सांगतो, आम्ही काहीही न ठरवता अचानकच आमचे रियुनियन ठरले. आम्ही कामात व्यग्र नसल्याने सगळ्यांनी भेटायचे ठरवले, आम्ही कॉफी प्यायला एकत्र भेटलो. गेल्या आठवड्यात आमचे हे गेटटूगेदर झाले. आभास (आभास मेहता) चित्रीकरणात व्यग्र असल्याने त्याला आम्हाला भेटणे जमले नाही. पण आम्ही सगळ्यांनी त्याला खूप मिस केले. सगळ्यांना खूप दिवसांनी भेटून आम्हाला प्रचंड आनंद झाला. आम्ही सगळ्यांनी चित्रीकरणाच्यावेळेच्या खूप साऱ्या गप्पा मारल्या. तसेच एकमेकांसोबत खूप मजा-मस्ती केली. आम्ही खूप तास गप्पा मारल्या. आमच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आमचे गेटटुगेदर खूपच छान झाले. 

Web Title: Gate Together of the Brahmarasakas artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.