गजर कीर्तनाचा या खास कार्यक्रमाची ५०० भागांची पूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 06:00 IST2018-07-09T15:09:15+5:302018-07-10T06:00:00+5:30

गजर कीर्तनाचा या कार्यक्रमातून कीर्तन अनुभवायची संधी प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार आहे.

Fulfillment of 500 parts of this special event of the alarm kirtan | गजर कीर्तनाचा या खास कार्यक्रमाची ५०० भागांची पूर्ती

गजर कीर्तनाचा या खास कार्यक्रमाची ५०० भागांची पूर्ती

मराठी संस्कृती आणि मूल्य झी टॉकीजनी आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीच त्यांच्या सादरीकरणातून जपली आहे. झी टॉकीज प्रस्तुत 'गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा' म्हणजे भक्तजन आणि प्रेक्षक यांच्यासाठी भक्तिमय कीर्तनाची पर्वणीच. या सप्ताहापासून ते आषाढी एकादशीपर्यंत या कार्यक्रमात वारी विशेष भाग सादर करण्यात येणार आहेत आणि त्यानिमित्त प्रेक्षक विशेष कीर्तनाचा आनंद शकतील. या आषाढीच्या वारीला जाणे म्हणजे एक वेगळाच सुखानुभव आहे. भक्तांच्या या महासागरातील एक बिंदू होऊन त्यांच्या श्रद्धेचा, भक्तीभावाचा अनुभव घेण्याची हि एक दुर्मिळ संधी आहे. गजर कीर्तनाचा या कार्यक्रमातून कीर्तन अनुभवायची संधी प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार आहे.

या कार्यक्रमाने नुकताच ५०० भागांचा टप्पा गाठला आणि योगयायोग असा आहे कि हा ५०० वा भाग आषाढी वारीसुरु होण्याचा आदल्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. झी टॉकीज प्रस्तुत 'गजर कीर्तनाचा' हा खास कार्यक्रम म्हणजे पांडुरंगाच्या नामस्मरणात व भजन-कीर्तनात दंग असलेली एक प्रकारची वारीचं आहे आणि या वारीने गेल्या वर्षभराहूनही अधिक काळात मजल-दरमजल करीत ५०० भागांचा टप्पा गाठला आहे. आजकालच्या केवळ मारोरंजनाच्या काळात, कीर्तनासारखा आध्यात्मिक कार्यक्रमही इतकी मोठी मजल मारू शकतो, हि अतिशय आनंदाची बाब आहे. आणि हे शक्य झालं, ते म्हणजे हजारो, लाखों प्रेक्षकांमुळे, ज्यांनी या कीर्तनाच्या वारीत या कार्यक्रमाची साथ दिली.  

या सप्ताहात या कार्यक्रमात ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज वाबळे कीर्तन सादर करणार आहेत. ते महाराष्ट्रातील एक जेष्ठ आणि समाजविमुख कीर्तनकार म्हणून ते ओळखले जातात. गेली ३५ वर्षे महाराष्ट्रभर व राज्याबाहेरही त्यांची कीर्तनसेवा अखंड सुरु आहे. ते या कीर्तनातून प्रेक्षकांशी सेवेची वारी या विषयावर संवाद साधणार आहेत

Web Title: Fulfillment of 500 parts of this special event of the alarm kirtan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.