फ्रेशर्सच्या मिताली मयेकरला आवडतात चीनी मोदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 16:44 IST2017-01-04T14:20:39+5:302017-01-05T16:44:02+5:30
अभिनेत्री मिताली मयेकरने चित्रपट आणि मालिकांमधील तिच्या अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. ती सध्या फ्रेशर्स या मालिकेत ...
(16).jpg)
फ्रेशर्सच्या मिताली मयेकरला आवडतात चीनी मोदक
भिनेत्री मिताली मयेकरने चित्रपट आणि मालिकांमधील तिच्या अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. ती सध्या फ्रेशर्स या मालिकेत झळकत आहे. तुमच्या या लाडक्या मितालीला खायला काय आवडते माहितीय का तुम्हाला. चीनी मोदक ही मितालीची आवडती डिश आहे. अहो चीन मोदक हा काही नवीन पदार्थ नाही. तर चीन मध्ये प्रसिदध असलेले मामोज मितालीला जाम आवडतात. वाट्टेल ते होऊ दे, जग इकडचं तिकडे होऊ दे , पण दिवसभरात मिताली कमीत कमी एकदा तरी मोमोज खातेच , सेट वर सुद्धा तिच्या खाण्यात मुद्दाम मोमोज आणले जातात . मोमोज पाहिल्यानंतर मितालीच्या चेहºयावरील आनंद बघण्यासारखा असतो. . मिताली मोमोजसाठी पूर्णपणे वेडी आहे .या संदर्भात मितालीला विचारले असता ती म्हणाली , मोमो चीनमध्येही सर्वत्र आवडीने खाल्ला जाणारा आणि चीनी कुसीनची खासियत म्हणून मिळणारा पदार्थ आहे... वेगवेगळ्या सामिश व भाज्यांचे सारण घालून केलेले व वेगवेगळ्या आकारांचे १५-२० किंवा त्यापेक्षा जास्तच प्रकार मिळतात.मोमोज हा पदार्थ आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीतला आद्य समजला जाणारा, मोदकासारखा दिसणारा असल्याने मोमोजला पाहताचक्षणी मोदकाची आठवण येते.मोमो तर मी चीनी मोदक म्हणत पटापट गट्टम करते .व्हेज मोमोजमध्ये शिमला मिरची, कोबी, गाजर, पनीर, तिळाचे तेल, काळी मिरची, लाल मिरची, हिरवी मिरची, अद्रक, सोया सॉस, कोथिंबीर असं बरंच काही असतं जे माज्या काय पण तुमच्या पण तोंडाला पाणी सोडेल .असं म्हणतात कि नॉनव्हेज मोमोजची मजाच वेगळी आहे पण मी पूर्णपणे शाकाहारी असल्याने मला व्हेज मोमोज आवडतात . आमच्या ठाण्यामध्ये एक फक्त मोमोज चे फंडू हॉटेल आहे मी तिथे नेहमीच मोमोज साठी जाते .
![]()