या कारणामुळे अंशुमन विचारेनं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला ठोकला होता रामराम, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 02:18 PM2024-01-09T14:18:16+5:302024-01-09T14:18:33+5:30

Anshuman Vichare : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोमधून अभिनेता अंशुमन विचारे घराघरात लोकप्रिय झाला. त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे

For this reason, Anshuman Vichare had left 'Maharashtrachi Hasyajatra' show, know about it | या कारणामुळे अंशुमन विचारेनं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला ठोकला होता रामराम, जाणून घ्या याबद्दल

या कारणामुळे अंशुमन विचारेनं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला ठोकला होता रामराम, जाणून घ्या याबद्दल

महाराष्ट्राची हास्यजत्रा, कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोमधून अभिनेता अंशुमन विचारे घराघरात लोकप्रिय झाला. त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकतेच अंशुमन विचारे(Anshuman Vichare)ने त्याची पत्नी पल्लवी आणि लेक अन्वीसोबत लोकमत फिल्मीच्या लव्ह गेम लोचा या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) सोडण्यामागचे कारण सांगितले.

अंशुमन विचारेने लोकमत फिल्मीच्या लव्ह गेम लोचा या शोमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्यामागचे कारण सांगितले. तो म्हणाला की, २०१९ ला कोरोना सुरू झाला. त्यानंतर आऊटडोअर बबल शूट सुरू केले. लेक दोन वर्षांची होती. खरं सांगायचं तर मी मेंटली कंटाळलो होतो. मी एक गोष्ट एका पातळीवर गेल्यावर थांबवतो. कारण काही नवीन क्रिएशन होत नाही, असे मला वाटतं. 

''एक वर्ष मी काहीच काम केले नाही''

तो पुढे म्हणाला की, प्रत्येक प्रोजेक्ट एका लेवल केल्यानंतर त्यात काम करणे थांबवले आहे. पत्नीला म्हणालो की मी आता कंटाळलो आहे. कॉमेडी एक्सप्रेस, फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा शो केले. एका लेवल तेच तेच करुन कंटाळा आला होता. एक कलाकार म्हणून थांबतो. माझी इंप्रुमेंट होत नाही. तर पत्नी काम थांबव म्हणाली. पण आपलं पुढं कसं होणार असा प्रश्न मला पडला होता. पण ती म्हणाली की, आपल्याला गरजा फार कमी आहेत. आपली जेवढी गरज आहे, ते भागेल. त्यामुळे आमटी भात खाऊन मॅनेज करु शकतो. हा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे, कारण मी एक वर्ष काहीच काम केले नव्हते. 

अंशुमन विचारे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक लोकप्रिय सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं आहे. फु बाई फु, कॉमेडीची बुलेट ट्रेन, घरोघरी, कानामागून आली, या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. तर,  संघर्ष, भरत आला परत, मिसळ पाव, सूर राहू दे, शिनमा, परतू, पोश्टर बॉईज, वेड लावी जिवा या चित्रपटात त्याने काम केले आहे.

Web Title: For this reason, Anshuman Vichare had left 'Maharashtrachi Hasyajatra' show, know about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.