'नवा गडी नवं राज्य' मालिका सुरु होण्याआधी पहिल्यांदाच पार पडले प्रिमिअर, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 11:38 AM2022-08-06T11:38:48+5:302022-08-06T11:45:32+5:30

 'नवा गडी नवं राज्य'(Nava Gadi Nava Rajya) मालिकेत अनिता दाते हिच्याशिवाय पल्लवी पाटील, वर्षा दांदळे अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे.

For the first time, the grand premiere was held before the start of the series Nava Gadi Nava Rajya | 'नवा गडी नवं राज्य' मालिका सुरु होण्याआधी पहिल्यांदाच पार पडले प्रिमिअर, जाणून घ्या याविषयी

'नवा गडी नवं राज्य' मालिका सुरु होण्याआधी पहिल्यांदाच पार पडले प्रिमिअर, जाणून घ्या याविषयी

googlenewsNext

 'नवा गडी नवं राज्य'(Nava Gadi Nava Rajya) ही मालिका ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अनिता दाते हिच्याशिवाय पल्लवी पाटील, वर्षा दांदळे अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. अनिता दाते,कश्यप परुळेकर,  पल्लवी पाटील सोबतच साईशा भोईर असणार आहेत.  

झी मराठीने टेलिव्हिजनच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदांच मालिकेच्या निमित्ताने दिव्य प्रीमियर सोहळा मुंबईमध्ये आयोजित केला होता, ह्यावेळी मालिकेचे सर्व कलाकार उपस्थित होती. अनिता दाते, पल्लवी पाटील आणि कश्यप परुळेकर ह्यांनी आनंद व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या, "आम्ही ह्या प्रीमियरसाठी खूप उत्सुक होतो कारण मराठी मालिकेचा असा भव्य प्रीमियर होणं हे कदाचित पहिल्यांदाच होत असेल. ह्यासाठी आम्ही व आमच्या सर्व टीमने खूप मेहेनत घेतली. प्रीमियर बघून आम्ही खूप खुश झालो आहोत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमची ही आगळीवेगळी  मालिका प्रेक्षकांच्या मनात नक्कीच स्थान मिळवेल. 

 मालिकेत अनिता दातेचं पात्र या जगात नसल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण तरिही तिचं पात्र महत्त्वपूर्ण असणार आहे. एका खोडकर भूमिकेत ती पहायला मिळणार आहे. घरावर राज्य असणाऱ्या एकीचा संसार अर्धवट राहतो आणि तो पूर्ण करण्यासाठी दुसरी बायको घरात येते.  रमाच्या जाण्यानंतर तिचा नवरा दुसरं लग्न करतो आणि आनंदी नवी बायको बनून घरात येते. रमाचा अर्धवट राहिलेला संसार सावरायला आलेल्या आनंदीला मात्र घरातून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. रमा आणि आनंदीमधला एक खोडकर संवाद दाखवला आहे. ज्यात रमा आनंदीला हे पटवून देत आहे की आज तिच्या जाण्यानंतर सुद्धा तिची जागा कोणीच घेऊ शकलेलं नाही तर दुसरीकडे आनंदी मात्र हा ठाम निश्चय करून आली आहे की सगळ्यांना आपलंस करून त्यांचं मन जिंकूनच दाखवेन..

Web Title: For the first time, the grand premiere was held before the start of the series Nava Gadi Nava Rajya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.