"फ्लशला इगो असून चालणार नाही", शशांक केतकरची मजेशीर पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 18:38 IST2024-04-12T18:37:32+5:302024-04-12T18:38:25+5:30
Shashank Ketkar : शशांक केतकरने नुकताच सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

"फ्लशला इगो असून चालणार नाही", शशांक केतकरची मजेशीर पोस्ट
अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा (Muramba) मालिकेत काम करताना दिसतो आहे. या मालिकेत त्याने साकारलेली अक्षयची भूमिका चाहत्यांना खूप भावते आहे. शशांक सोशल मीडियावर सक्रीय असून तो बऱ्याचदा सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसतो. दरम्यान आता त्याने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेता शशांक केतकरने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तो सेटवरील मेकअप रुममध्ये आहे. तिथे तो एका आरशा असलेला दरवाजासमोर कॅमेरा पकडून व्हिडीओ शूट करत आहे आणि म्हणताना दिसतो आहे की, भेंडी आजकाल कोणालाही इगो असतो, बघा असे म्हणत टॉयलेटचा दरवाजा खोलतो आणि वॉटर टँकवरील इगो हे कंपनीचं नाव दाखवतो. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, फ्लशला इगो असून चालणार नाही!!!! वांदे होतील #ego जागच्या जागी उतरवला पाहिजे! फार वाढत चाललाय #निव्वळमजा #fun #shootlife #outdoors .
शशांक केतकरच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एकाने लिहिले की, काहीही हं श्री. दुसऱ्या युजरने लिहिले की, इगो को फ्लश कर दिया. आणखी एकाने लिहिले की, खूपच मजेशीर.
वर्कफ्रंट
शशांक केतकरने मालिकेव्यतिरिक्त चित्रपट आणि नाटकातही काम केले आहे. नुकताच तो इमरान हाश्मीच्या शो टाइम या हिंदी वेबसीरिजमध्ये झळकला. . याआधी तो 'स्कॅम २००३' या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. सध्या शशांक 'मुरांबा' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.