उडानने 1000 एपिसोडचा महत्वाचा टप्पा गाठला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 13:17 IST2018-03-19T07:47:58+5:302018-03-19T13:17:58+5:30

एक लक्षवेधक निवेदन, सामजिक अन्याया विरूद्ध उठवलेला एक आवाज आणि दिमाखदार परफॉर्मन्सेसनी चर्चेत राहिलेला कलर्सच्या उडान या शोने प्रारंभापासूनच ...

The flight reached an important stage of 1000 episodes | उडानने 1000 एपिसोडचा महत्वाचा टप्पा गाठला

उडानने 1000 एपिसोडचा महत्वाचा टप्पा गाठला

लक्षवेधक निवेदन, सामजिक अन्याया विरूद्ध उठवलेला एक आवाज आणि दिमाखदार परफॉर्मन्सेसनी चर्चेत राहिलेला कलर्सच्या उडान या शोने प्रारंभापासूनच सर्वांची मने जिंकली आहेत.TRP चार्ट वर राज्य करणाऱ्या भारतीय टेलिव्हिजन वरील पहिल्या 10 शों मधील एक बनलेल्या या सामाजिक नाट्यामध्ये स्वतंत्र बाण्याच्या चकोरचे जीवन प्रदर्शित केले आहे जी वेठबिगारीच्या साखळ्या तिच्या हिंमतीने आणि निश्चयाने तोडून टाकते.उडानची संकल्पना आहे महेश भट्ट यांची आणि त्याचे निर्माते आहेत गुरूदेव भल्ला व धवल जयंतीलाल गाडा.त्यातील अनेक कलाटण्या वळणांमुळे या शोने 1000 वा एपिसोडचा टप्पा गाठला आहे.

याबद्दल बोलताना, महेश भट्ट म्हणाले, “स्वतंत्र होण्याचे जुने स्वप्न जे 7 वर्षांपूर्वी सुरू झाले होते ते आज सामाजिक अन्याय, कौटुंबिक वैर आणि भावनांचे अडथळे या सर्वांतून मुक्ती मिळविण्याचा एक प्रबळ सागा बनले आहे. आपल्या समाजाच्या मनांमध्ये ही संकल्पना निनादत आहे हे पाहून भारावल्यासारखे झाले आहे. 1000 वा एपिसोड पूर्ण केल्यासाठी मी उडानच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देत आहे आणि अजून पुढचे टप्पे ते गाठोत अशी शुभेच्छा सुद्धा व्यक्त करतो.”यातच पुढे कलर्सच्या प्रोग्रमिंग प्रमुख मनिषा शर्मा म्हणाल्या, “उडान एक शो म्हणून नेहमीच उत्कृष्ट राहिला आहे आणि त्यातील कथेने प्रेक्षकांना सतत गुंतवून ठेवले आहे. आठवड्यां मागून आठवडे त्याचा नंबर वरचढच राहिला आहे. हा माइलस्टोन आम्ही साजरा करत असताना आमच्याकडे शो साठी काही योजना आहेत. चकोर एक वेठबिगार मजूर असल्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी केलेल्या संघर्षमय लढाईतून  तिला जीवनाचा मार्ग सापडला आहे.”मीरा देवस्थळे (चकोर) म्हणाल्या, “माझ्यासाठी, उडान हा फक्त एक शो नसून तो माझ्या जीवनाचा एक भाग बनला आङे. चकोर माझ्यासाठी एक प्रेरणा आहे आणि मला विश्वास आहे की मी साकारलेले हे आदर्श पात्र आमचा शो पाहणाऱ्या प्रेक्षकांना असेच प्रेरणादायी ठरेल.”मीराच्या भावनेला प्रतिसाद देत विजयेंद्र कुमेरिया (सूरज) म्हणाले, “उडानने 1000 एपिसोड पूर्ण केले आहेत आणि माझा त्यावर विश्वासच बसत नाही. टेलिव्हिजन वरील टॉप रेटेड शोंच्या पंगतीत आज सुद्धा आम्ही प्रेक्षकांच्या अखंड पाठिंबा आणि प्रेमामुळेच पोचलो आहोत.”आपली उत्सुकता दाखवत विधी पंड्या (इमली) म्हणाल्या, “जेव्हा मी शो मध्येसमील झाले तेव्हा मला आनंद झाला होता की मी एका तेजस्वी कथा असणाऱ्या शो मध्ये काम करत आहे आणि तो शो रुळलेल्या वाटा मोडणारा चॅनेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या चॅनेल वरून प्रक्षेपित केला जात आहे. काही काळ गेल्यानंतर या शो मुळे माझ्यातील अभिनेत्रीचा विकास तर झालाच आहे पण एक व्यक्ती म्हणून सुद्धा मी विकसीत झाले आहे. माझ्या पात्रावर प्रेक्षकांनी जो प्रेमाचा अती वर्षाव केला आहे त्यासाठी मी त्यांची कृतज्ञ आहे.’’निर्माते धवल जयंतिलाल गाडा म्हणाले, “उडान मधून आज सुद्धा आपल्या देशात आढळून येणाऱ्या समस्या आणि रीतींवर प्रकाश टाकण्याचा आमचा प्रयत्न होता. योग्य असलेल्या गोष्टीसाठी चकोरच्या लढाईने प्रेक्षकांशी नाळ नक्कीच जोडली आहे.”निर्माते गुरुदेव भल्ला म्हणाले, “मागील साडेतीन वर्षांपासून उडानला संपूर्ण जगभरातून मिळत असलेला सततचा पाठिंबा तृप्त करणारा आहे. प्रेक्षकांची नस ओळखण्यावर आम्ही भर दिला होता आणि ते आमच्यासाठी काम करून गेले.”
 

Web Title: The flight reached an important stage of 1000 episodes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.