​या मराठी मालिकेत पहिल्यांदाच घडली ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 17:40 IST2016-11-04T17:40:20+5:302016-11-04T17:40:20+5:30

छोटा पडदादेखील आता मोठा झाला आहे. छोट्या पडद्यावर नेहमीच आपल्याला वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतात. हिंदी मालिकांप्रमाणे मराठी मालिकादेखील आता ...

This is the first thing that happened in the Marathi series | ​या मराठी मालिकेत पहिल्यांदाच घडली ही गोष्ट

​या मराठी मालिकेत पहिल्यांदाच घडली ही गोष्ट

टा पडदादेखील आता मोठा झाला आहे. छोट्या पडद्यावर नेहमीच आपल्याला वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतात. हिंदी मालिकांप्रमाणे मराठी मालिकादेखील आता लोकांच्या गळ्यातल्या ताईत बनल्या आहेत. या मालिकांमधले कलाकार तर प्रेक्षकांचे प्रचंड लाडके असतात. आपली मालिका लोकांना आवडावी यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो.
नकुशी या मालिकेतदेखील आता एक वेगळा प्रयोग करण्यात येणार आहे. आतापर्यंत मालिकांमध्ये एखादे गाणे दाखवण्यात आल्याचे आपण पाहिले आहे. कथानकाच्या मागणीनुसार मालिकेत एखादे प्रेमगीत अथवा विरहगीत टाकले जाते. पण पहिल्यांदाच एका मालिकेत संपूर्ण भागात केवळ गाणी ऐकायला मिळणार आहेत.
नकुशी या मालिकेला नुकतेच एक वळण मिळाले आहे. नकुशीने कोणाच्याही प्रेमात पडू नये असे तिच्या वडिलांचे म्हणणे होते. ती कधी कोणाच्या प्रेमात पडणार नाही असे वचनदेखील तिने वडिलांना दिले होते. पण तरीही ती आता प्रेमात पडणार आहे. तिचा प्रेमात पडण्याचा हा प्रवास गाण्यांद्वारे दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे एका संपूर्ण भागात प्रेक्षकांना गाणीच ऐकायला मिळणार आहेत. 
या मालिकेच्या या भागासाठी खास गाणी बनवण्यात आलेली आहेत. ही गीणी गीतकार समीर सावंत यांनी लिहिले असून अनिरुद्ध जोशी आणि आनंदी जोशीने ही गाणी लिहिली आहेत तर संगीत अनिरुद्ध जोशीने दिले आहे. या गाण्यांचे चित्रीकरण कास पठार आणि वाईच्या काही भागांमध्ये करण्यात आले. या गाण्यांचे चित्रीकरण करण्यास सगळेच खूप उत्सुक होते. ही गाणी प्रेक्षकांना आवडतील अशी या टीमला खात्री आहे. 

Web Title: This is the first thing that happened in the Marathi series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.