​अभिनेता स्वप्निल जोशीची निर्मिती असलेली पहिली मालिका 'नकळत सारे घडले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 16:41 IST2017-11-06T11:11:40+5:302017-11-06T16:41:40+5:30

अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्निल जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली ...

The first series to be produced by actor, Swapnil Joshi, 'All done unknowingly' | ​अभिनेता स्वप्निल जोशीची निर्मिती असलेली पहिली मालिका 'नकळत सारे घडले'

​अभिनेता स्वप्निल जोशीची निर्मिती असलेली पहिली मालिका 'नकळत सारे घडले'

ेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्निल जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली 'नकळत सारे घडली' ही मालिका २७ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच लाँच झाला असून एक रंगतदार प्रेमकहाणी या मालिकेत पाहायला मिळेल असा अंदाज या प्रोमोवरून येत आहे. या प्रोमोला सोशल मीडियामध्ये उदंड प्रतिसाद मिळत असून हा प्रोमो स्वप्निलने ट्वीटही केला आहे. सिने आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील स्वप्निलच्या मित्रमंडळींने त्याला ट्विटर आणि फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवरून त्याच्या या नव्या इनिंगसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. स्वप्निलने अर्जुन सिंह बरन आणि कार्तिक निशानदार यांच्या जीसीम्स या निर्मिती संस्थेत सहभागी होत या मालिकेची निर्मिती केली आहे.
स्टार प्रवाहने आपल्या मालिकांतून कायमच नवे आणि वेगळे विषय सादर केले आहेत. 'नकळत सारे घडले' ही मालिकाही त्याला अपवाद नाहीये. या मालिकेचा नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या प्रोमोचा लुक एकदम फ्रेश आहे. छोटी मुलगी, तिचे बाबा आणि डॉक्टर आंटी यांच्यातले विलक्षण नाते यात पाहायला मिळत आहे. लोकप्रिय मालिकांमुळे परिचित असलेला हरीश दुधाडे आणि नुपूर परूळेकर या प्रोमोमध्ये दिसत असून बाल कलाकार सान्वी रत्नलिकरचे लोभस, गोड दिसणे लक्षणीय ठरत आहे. मात्र मालिकेच्या कथानकाचा अद्याप उलगडा झालेला नाही.
नकळत सारे घडले या मालिकेद्वारे टेलिव्हिजनवर निर्माता म्हणून पदार्पण करण्याबाबत स्वप्निल सांगतो, 'निर्मिती करण्याचा विचार बऱ्याच काळापासून माझ्या मनात होता. त्यामुळे अर्जुन सिंह बरन आणि कार्तिक निशानदार यांच्या जीसीम्स या निर्मिती संस्थेत मी सहभागी झालो. माझे आणि स्टार प्रवाहचे खूपच जुने नाते आहे. म्हणूनच स्टार प्रवाहबरोबर मालिका करायला मी खूप कम्फर्टेबल होतो. 'नकळत सारे घडले' या रोमँटिक मालिकेच्या रूपाने हा विचार प्रत्यक्षात आला आहे. आजवर प्रेक्षकांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे. तसेच या माझ्या नव्या कलाकृतीवरही करतील याची खात्री आहे.'

Also Read : स्वप्निल जोशीला स्क्रीनवर पाहिल्यावर काय करते मायरा

Web Title: The first series to be produced by actor, Swapnil Joshi, 'All done unknowingly'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.