छोट्या पडद्यावरची नव्या झाली आई, सोशल मीडियावर शेअर केला बाळाचा पहिला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 17:08 IST2017-11-07T11:28:31+5:302017-11-07T17:08:13+5:30
छोट्या पडद्यावर नई धडकन नई सवाल'मालिकेतील नव्याची भूमिका साकारणारी सौम्या सेठ आई झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस ...

छोट्या पडद्यावरची नव्या झाली आई, सोशल मीडियावर शेअर केला बाळाचा पहिला फोटो
'चक्रवर्ती अशोक सम्राट' ही आजच्या टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त आवडत्या ऐतिहासिक नाट्यमय मालिकांमधील एक आहे. या मालिकेत कौरवकीच्या भूमिकेत सौम्या सेठ झळकली होते.सौम्याही बॉलिवूडचे चीची म्हणजेच गोविंदाची भाची आहे.मात्र अभिनय क्षेत्रात असताना तिने कधीच गोविंदाची ती भाची असल्याचे समोर येऊ दिले नाही.मुळात नेहमीच तिने स्वबळावर या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत यश मिळवले असल्याचे सांगितले.सध्या सौम्याने मालिकेतून ब्रेक घेतला असला तरीही ती लवकरच चांगला प्रोजेक्टची ऑफर आली तर छोट्या पडद्यावर परतणार असल्याचे म्हटले होते. आता तर तिच्या आयुष्यात एका चिमुकल्याचे आगमन झाल्यामुळे सध्या तरी तिने तिच्या करिअरचा कोणताच विचार केलेला नाहीय.सध्या बाळाची काळजी घेण्यात आणि पर्सनल लाईफ एन्जॉय करताना दिसतेय.