एकता कपूरच्या अडचणीत वाढ, ऑल्ट बालाजीवरील वेबसिरीजविरोधात मुंबईनंतर या शहरांमध्ये गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 06:03 PM2020-06-06T18:03:32+5:302020-06-06T18:08:48+5:30

या वेबसीरिजमधील एका प्रसंगात आपल्या भारतीय जवानांचा आणि लष्करी वर्दीचा अपमान झाल्याचा दावा त्याने केला आहे

fir against ekta kapoor and three others for triple x2 web series | एकता कपूरच्या अडचणीत वाढ, ऑल्ट बालाजीवरील वेबसिरीजविरोधात मुंबईनंतर या शहरांमध्ये गुन्हा दाखल

एकता कपूरच्या अडचणीत वाढ, ऑल्ट बालाजीवरील वेबसिरीजविरोधात मुंबईनंतर या शहरांमध्ये गुन्हा दाखल

googlenewsNext

टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरसह तीन लोकांना विरोधात अश्लिलता पसरवणे आणि राष्ट्रीय चिन्हांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एकता कपूरवरील ही एफआयआर ओटीटीच्या प्लेटफॉर्मवर  अल्टबालाजीवर प्रसारित झालेल्या 'ट्रिपल एक्स"च्या सीजन-2' वेबसीरिज विरोधात दाखल करण्यात आली आहे. मध्यप्रदेशमधील इंदोरमधल्या अन्नपूर्णा पोलिस ठाण्यात एकता विरोधात तक्रार  दाखल करण्यात आली आहे. 

याआधी मुंबईत देखील एकता विरोधात हिंदुस्तानी भाऊने एफआयआर दाखल केली आहे. एकता एकपूरने वेबसीरिजमध्ये जवान आपल्या कर्तव्यावर गेल्यानंतर त्याची पत्नी आपल्या बॉयफ्रेन्डला घरी बोलवते. या वेबसीरिजमधील एका प्रसंगात आपल्या देशाची शान असलेल्या भारतीय लष्कराचा, भारतीय जवानांचा आणि लष्करी वर्दीचा अपमान झाल्याचा दावा त्याने केला आहे होता. यापूर्वी, कन्फेडरेशन ऑफ एक्स पॅरामिलिटरी फोर्स वेलफेअर असोसिएशनने राष्ट्रपतींकडे याबाबत तक्रार केली होती.असोसिएशनचे सरचिटणीस रणबीर सिंह म्हणाले की लाखो सैनिक अशा बेजबाबदार चित्रीकरणाला विरोध करतात. दिल्लीमध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. 


 
एकता कपूरच्या निकटवर्तीयांकडून तो सीन वेबसिरीजमधून  हटवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र याबाबत अजून कोणतेच अधिकृत स्टेटमेंट आलेले नाही. 

Web Title: fir against ekta kapoor and three others for triple x2 web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.