मालिकेचे चित्रीकरण स्वित्झर्लंडमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 13:04 IST2016-10-03T07:34:05+5:302016-10-03T13:04:05+5:30
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील कार्तिक आणि नैराची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते. या जोडीला प्रेमाने कैरा असे ...

मालिकेचे चित्रीकरण स्वित्झर्लंडमध्ये
य रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील कार्तिक आणि नैराची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते. या जोडीला प्रेमाने कैरा असे म्हटले जाते. कार्तिकची भूमिका साकारणारा मोहसिन खान आणि नैराची भूमिका साकारणारी शिवांगी जोशी नुकतेच स्वित्झर्लंडमध्ये चित्रीकरण करून परतले आहेत. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण आपल्याला आतापर्यंत स्वित्झर्लंडमध्ये पाहायला मिळाले आहे. यश चोप्रा यांच्या चित्रपटातील एक तरी गाणे स्वित्झर्लंडमध्ये चित्रीत केले जात असे. चित्रपटानंतर आता मालिकांचे निर्मातेही स्वित्झर्लंडच्या प्रेमात पडले आहेत. कार्तिक आणि नैरा यांच्यावर स्वित्झर्लंडमध्ये खुदा जाने ये, तुम पास आये यांसारखी गाणी चित्रीत करण्यात आली. या अनुभवाविषयी मोहसिन सांगतो, "या गाण्यांचे चित्रीकरण करताना आम्ही एखाद्या चित्रपटाचेच चित्रीकरण करत आहोत असे आम्हाला वाटत होते. स्विस आल्पसच्या पर्वतरांगांमध्ये तसेच झुरीकच्या रस्त्यांवर आम्ही या गाण्यांचे चित्रीकरण केले. स्वित्झर्लंडमधील चित्रीकरणाचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता."