'माझ्या नव-याची बायको'मधली राधिका बनणार स्त्री उद्योजिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 13:01 IST2018-03-23T07:31:53+5:302018-03-23T13:01:53+5:30

गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं; असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली, माझ्या नवऱ्याची बायको, ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर ...

Female entrepreneur to become Radhika in 'My New Wife's Wife' | 'माझ्या नव-याची बायको'मधली राधिका बनणार स्त्री उद्योजिका

'माझ्या नव-याची बायको'मधली राधिका बनणार स्त्री उद्योजिका

ड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं; असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली, माझ्या नवऱ्याची बायको, ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, स्वावलंबी, राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी नखरेल, शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला, बिचारा, गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. नवनवीन ट्विस्ट आणि टर्न यामुळे दिवसेंदिवस रोमांचक आणि रंजक बनत चाललेल्या या मालिकेने आता घेतलंय एक नव वळण!

मालिकेत राधिकाचा मेक ओव्हर होतोय, आनंद, पानवलकर, जेनी, दामलेकाका, समिधा आणि रेवती या सगळ्यांच्या सोबतीने ती स्वतःची कंपनी सुरु करतेय. राधिका आता “स्त्री उद्योजिका” म्हणून रसिकांच्या भेटीला येत आहे. आपल्या मुलाकडे अथर्व कडे दुर्लक्ष न करता ती हा डोलारा उभा करणार आहे. 

'माझ्या नव-याची बायको' मालिकेनं आता रंजक वळण घेतलंय.कारण रेवती आणि सुबोध दोघांनीही त्यांच्या आयुष्याची नव्याने सुरूवात केली आहे. राधिकाची बेस्ट फ्रेंड अर्थातच रेवतीने अखेर सुबोधसह लग्नाच्या बेडीत अकडली आहे.सुबोध आणि रेवतीच्या हळदीच्या कार्यक्रमानंतर आता लग्नविधी पाहायला मिळणार आहेत.वर-वधूच्या रुपात रेवती आणि सुबोध अतिशय सुंदर दिसले.यावेळी रेवतीने लग्नात पिवळ्या नऊवारी परिधान केली होती.तर सुबोधनेही निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. ऑनस्क्रीन रंगणा-या विवाहसोहळ्यासाठी सारेच खूप उत्सुक होते. या मालिकेत रेवतीचं लग्न मोडलं असून लेकीचा सांभाळ करते. गुरु आणि शनायाच्या अफेअरचा सगळ्यात आधी संशय हा रेवतीलाच येतो.रेवतीची मदत घेऊन राधिकाने शनाय आणि गुरुनाथला धडा शिकवला आहे.रेवतीची हीच भूमिका अभिनेत्री श्वेता मेहंदळे हिने साकारली आहे.

Web Title: Female entrepreneur to become Radhika in 'My New Wife's Wife'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.