​फर्नाझ शेट्टी झळकणार झी टीव्हीवरील फिअर फाईल्समध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 15:03 IST2017-12-18T09:33:53+5:302017-12-18T15:03:53+5:30

झी टीव्हीवरील लोकप्रिय हॉरर शो फिअर फाईल्सचा नवीन सीझन आता स्टॅन्ड अलोन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्टॅन्ड अलोनमधील रोचक ...

Fearless Shetty will be seen in Zee TV's Fear Files | ​फर्नाझ शेट्टी झळकणार झी टीव्हीवरील फिअर फाईल्समध्ये

​फर्नाझ शेट्टी झळकणार झी टीव्हीवरील फिअर फाईल्समध्ये

टीव्हीवरील लोकप्रिय हॉरर शो फिअर फाईल्सचा नवीन सीझन आता स्टॅन्ड अलोन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्टॅन्ड अलोनमधील रोचक कथा आणि धक्कादायक वळणे प्रेक्षकांचे मनोरंजन करतील अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. या मालिकेत फर्नाझ शेट्टी सिद्धी मिश्राच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धी मिश्रा ही मुंबईतील एक २३ वर्षीय मुलगी असून तिच्या आयुष्यात प्रवेश करणार असलेल्या भूतांबद्दल अनभिज्ञ आहे. सिद्धी आपल्या प्रियकरासोबत लग्न करण्याचे स्वप्न पाहत असताना गोष्टी विक्षिप्त वळण घेतात आणि त्यांच्या लग्नाच्या दिवशी डायन तिच्या पतीला पळवून नेते. त्यामुळे सिद्धी आपला हरवलेला पती दुष्यंतच्या शोधावर निघते आणि तिचा हा शोध तिला उत्तर भारतातील अनेक ठिकाणी घेऊन जातो. यात तिच्यासमोर बनारसमधील अघोरी, देवळांमध्ये भूतांनी पछाडलेले लोक, मेहेंदीपूर बालाजी मंदिरातील घाबरवून सोडणारे तांत्रिक येतात आणि ती एका भूतांचा वास असलेल्या ठिकाणी छळावाच्या तावडीतही सापडते. आपल्या भावी पतीला वाचवण्याचा सिद्धीचा निर्णय ठाम असतो. तिच्या वाटेत अनेक अडथळे येतात आणि अखेर ती भारतातील काळ्या जादूची राजधानी असलेल्या आसाममधील मयांग येथील कामाख्या मंदिरात जाऊन पोहोचते. तिचा हा शोध सुरू असतानाच सिद्धीला तिच्यामध्ये असलेल्या एका शक्तीविषयी कळते. ती आत्म्यांसोबत संवाद साधू शकते हे तिला कळल्यावर मग ती स्वशोधाच्या रोचक प्रवासावर निघते. या भूमिकेविषयी फर्नाझ शेट्टी सांगते, मला नेहमीच वेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्याची इच्छा आहे. त्यामुळे मला एक अभिनेत्री म्हणून विकसित होता येईल आणि एक कलाकार म्हणून माझ्यातील वैविध्यपूर्णता जगासमोर दाखवता येईल. मी प्रथमच एका हॉरर शोमध्ये काम करणार आहे आणि या शो चे कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासोबत काम करायला मी उत्सुक आहे. माझी व्यक्तिरेखा सिद्धी एक आनंदी आणि खेळकर मुलगी असून तिच्या लग्नाच्या दिवशी तिच्या भावी पतीला पळवून नेले जाते. आपल्या हरवलेला भावी पती दुष्यंतला शोधण्यासाठी निघालेल्या सिद्धीच्या प्रवासाची ही कथा आहे. ह्या प्रवासात तिला स्वतःमध्ये असलेल्या एका शक्तीचीही जाणीव होते, ज्याबद्दल आधी ती अनभिज्ञ असते. मला आशा आहे की प्रेक्षकांना ही कथा आणि माझी भूमिका आवडेल.

Also Read : ​फरनाझ शेट्टीने उचलले एक बोल्ड पाऊल!

Web Title: Fearless Shetty will be seen in Zee TV's Fear Files

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.