शेतकऱ्याची लेक! 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचे शेतात राबतानाचे फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 11:47 IST2025-10-13T11:46:39+5:302025-10-13T11:47:20+5:30
सिनेविश्वातील ग्लॅमर आणि प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री सध्या तिच्या साधेपणा आणि मातीशी असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली आहे.

शेतकऱ्याची लेक! 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचे शेतात राबतानाचे फोटो व्हायरल
सिनेविश्वातील ग्लॅमर आणि प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे सध्या तिच्या साधेपणा आणि मातीशी असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. 'अनघा'ची भूमिका साकारणारी अश्विनी खऱ्या आयुष्यात शेतकऱ्याची लेक आहे आणि तिने नुकतेच शेतात राबतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ती बऱ्याचदा शेतात राबताना दिसते आणि त्यामुळे तिचे चाहते नेहमी तिचे कौतुक करताना दिसतात.
अश्विनी महांगडेने सोशल मीडियावर शेतीची कामे करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, भर उन्हात ती शेतीत काम करताना दिसत आहे. या फोटोंसोबत तिने कॅप्शन लिहिले आहे. "हे फक्त फोटो नाहीत तर यात भावना आहेत.." असे तिने म्हटले आहे. तिच्या या वाक्यातून माती आणि शेतीबद्दलचे तिचे प्रेम स्पष्टपणे दिसून येते.
अभिनयाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून अश्विनी आपल्या शेतात जाऊन काम करते, हे पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्या साधेपणाचे आणि भूमिकेचे जोरदार कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले की, तुझं खूप कौतुक वाटत गं तायडे... अभिनेत्री म्हणून बाजूला आणि जन्म घेतलेल्या मातीतलं नातं एका बाजूला म्हणजेच साधी सरळ एक मुलगी. तर दुसऱ्याने म्हटले रॉयल शेतकरीण. आणखी एकाने लिहिले की, मातीतलं माणूस अश्विनी ताई किती वेळा मन जिंकणार. अशा प्रतिक्रिया देत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव नेटकऱ्यांनी केला आहे. यापूर्वीही अश्विनीने शेतात काम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम माणूस म्हणून तिने जपलेला हा साधेपणा सध्या सोशल मीडियावर अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
वर्कफ्रंट
अश्विनी महांगडे सध्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत काम करताना दिसते आहे. यापूर्वी ती आई कुठे काय करते मालिकेत पाहायला मिळाली. या मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. याशिवाय तिने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. या शिवाय ती महाराष्ट्र शाहीर, धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर - एक युग, बॉईज या सिनेमात झळकली आहे.