'हाय फिवर'शोमध्ये फराह खानने पहिल्यांदाच 'या' व्यक्तिविषयी केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 13:05 IST2018-04-12T07:35:50+5:302018-04-12T13:05:50+5:30

छोट्या पडद्यावर अल्पावधीतच 'हाय फिवर डान्स का नया तेवर' या शोने रसिकांची पसंती मिळवली आहे. या शोच्या बॉलिवूड स्पेशल ...

Farah Khan is the first person to reveal about 'this' person in High Fever! | 'हाय फिवर'शोमध्ये फराह खानने पहिल्यांदाच 'या' व्यक्तिविषयी केला खुलासा!

'हाय फिवर'शोमध्ये फराह खानने पहिल्यांदाच 'या' व्यक्तिविषयी केला खुलासा!

ट्या पडद्यावर अल्पावधीतच 'हाय फिवर डान्स का नया तेवर' या शोने रसिकांची पसंती मिळवली आहे. या शोच्या बॉलिवूड स्पेशल या आगामी भागात नृत्याच्या जगातील प्रतिष्ठित जोडी - नृत्य दिग्दर्शक, दिग्दर्शक, अभिनेत्री फराह खानने या शोमध्ये  हजेरी लावली होती.यावेळी नृत्य दिग्दर्शक गीता कपूर यांच्यातील सुंदर नाते प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या खास क्षणी गीता कपूरने आपल्या गुरु - फराह खानसाठी एका हृद्यस्पर्शी पत्राच्या माध्यमातून, हाय फिवर टीमच्या मदतीने एका सुंदर सरप्राईजचे आयोजन केले होते.गीता माँने लिहीलेले पत्र सेलिब्रिटी जज लारा दत्ताने सा-यांसमोर मांडले.हे पत्रच सांगते की गीता आणि फराह यांच्यात जगाच्या पलीकडे जाणारे असे एक वेगळे नाते दोघींमध्ये आहे.आपला फक्त गुरूच नाही तर आपली आईसुद्धा असलेल्या फराहचे तिने आभार मानले.आपण फराहचे खास का आहोत याविषयीही तिने काही खास गोष्टी सांगितल्या.हृद्यस्पर्शी पत्रानंतर भावुक झालेली फराह खान म्हणाली – “लारा तू ज्या क्षणी पत्र वाचायला सुरुवात केलीस,मला लगेच कळले की हे गीतुचेच आहे म्हणून.गीता ही माझ्या मुलीप्रमाणेच प्रिय आहे.गुरु आणि शिष्य एखाद्या आई व मुलाच्या पवित्र नात्यात बांधले जाणे हे खूप दुर्मिळ आहे. आज ती जे काही बनली आहे याचा मला प्रचंड अभिमान आहे. ती किती चांगल्याप्रकारे काम करते याचाच नाही तर ती स्वतःला कसे सादर करते याचाही.लोक यशस्वी आणि प्रसिद्ध होतात, तेव्हा आपल्या संघर्षाच्या काळात आपल्या सोबत कोणकोण होते हे ते विसरतात.गीताचे मात्र तसे नाही.अगदी आजही, कितीही यशोशिखरावर ती असली तरीही मी एखादे गाणे कोरिओग्राफ करताना ती तिची सगळी कामे सोडेल आणि येऊन माझ्या पाठीशी उभी राहील,मला साहाय्य करेल आणि मला पूर्ण पाठींबा देईल.माझ्या करिअरमध्ये तिने मोठी भूमिका बजावली आहे.आय लव्ह यू गीता, नेहमीप्रमाणे मला इमोशन ब्लॅकमेल केल्याबद्दल आभार” मानले.

Web Title: Farah Khan is the first person to reveal about 'this' person in High Fever!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.