Bigg Bossच्या या विजेतीची अवस्था पाहून चाहते पडले चिंतेत, तिला ओळखणंही झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 16:29 IST2021-10-11T16:29:29+5:302021-10-11T16:29:57+5:30
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बॉसची विजेतीची अवस्था पाहून लोक हैराण झाले आहेत. ही अभिनेत्री कोण आहे हे ओळखण्याचा प्रयत्न लोक करत आहेत.

Bigg Bossच्या या विजेतीची अवस्था पाहून चाहते पडले चिंतेत, तिला ओळखणंही झालंय कठीण
बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)ने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि आता बिग बॉसच्या १५व्या सीझनला सुरूवात झाली आहे. या दरम्यान बिग बॉसच्या विजेतीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे. लोकांना या फोटोतील अभिनेत्रीला ओळखतादेखील येत नाही आहे. त्यांना या अभिनेत्रीची अवस्था अशी का झाली असा प्रश्न लोकांना पडला आहे.
ही बिग बॉसची विजेती दुसरी तिसरी कुणी नाही तर बिग बॉस ओटीटीची विजेती अभिनेत्री दिव्या अग्रवाल आहे. ही दिव्या अग्रवाल आहे यावर तुमचा विश्वास बसत नाही आहे ना. पण हे तिचेच फोटो आहेत, जे व्हायरल होताना दिसत आहे. तिचा हा लूक तिच्या वेबसीरिजमधील आहे. हा लूक एस्थेटक मेकअपच्या माध्यमातून करण्यात आला आहे. दिव्या अग्रवाल ऑल्ट बालाजीची वेबसीरिज कार्टेलमधला आहे. यात ती वेगवेगळ्या अवतारात दिसली आहे. तिने या सीरिजमध्ये सीरियल किलरची भूमिका केली आहे.
या फोटोत बिग बॉसची विजेती दिव्या अग्रवाल एका वयस्कर महिलेच्या अवतारात दिसते आहे. पांढरे केस, डोळ्यावर चष्मा, चेहऱ्यावर सुरकुत्या आणि कार्डिगन परिधान केलेल्या अवस्थेत ती दिसते आहे. तिचा हा फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे. लोकांना अभिनेत्रीला ओळखणेदेखील कठीण झाले आहे. यापूर्वीदेखील तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात तिने वयस्कर पुरूषाचा वेश धारण केला होता. तसेच ती हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिलेच्या गेटअपमध्ये दिसते आहे. दोन्ही लूकमध्ये तिला ओळखता येत नाही.
स्पिल्ट्सव्हिला १० आणि रागिनी एमएसएस रिटर्न्स फेम अभिनेत्री दिव्या अग्रवाल नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ती बिग बॉस ओटीटीची विजेती झाली आहे. दिव्या खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आणि बिनधास्त आहे. तसाच तिचा अंदाज बिग बॉस ओटीटीमध्ये पहायला मिळाला होता.