'कुछ रंग प्यार के ऐसी भी' फेम एरिका फर्नांडिसला फोटोग्राफीचीही आवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 14:59 IST2017-01-21T09:29:04+5:302017-01-21T14:59:04+5:30

'कुछ रंग प्यार के ऐसी भी' मालिकेतील एरिका फर्नांडिस म्हणजेच सोनाक्षीचा मालिकेत बिंधास्त अंदाज पाहायला मिळतोय.सात वर्षाचा लीप घेत ...

Fame Erica Fernandes also liked photography as 'some color loving' too | 'कुछ रंग प्यार के ऐसी भी' फेम एरिका फर्नांडिसला फोटोग्राफीचीही आवड

'कुछ रंग प्यार के ऐसी भी' फेम एरिका फर्नांडिसला फोटोग्राफीचीही आवड

'
;कुछ रंग प्यार के ऐसी भी' मालिकेतील एरिका फर्नांडिस म्हणजेच सोनाक्षीचा मालिकेत बिंधास्त अंदाज पाहायला मिळतोय.सात वर्षाचा लीप घेत ही मालिका नव्या वळणावर पोहचली आहे. कथेप्रमाणेच आता डॉक्टर सोनाक्षी बोसचा लूकही चेंज झाला आहे.आधीपेक्षाही सोनाक्षी आता आधिक ग्लॅमरस दिसते. मात्र एरिका फर्नांडिसला ती साकारत असलेल्या भूमिकेप्रमाणेच आणखी एका गोष्टीची खूप आवड आहे.ती म्हणजे एरिका मालिकेच्या सेटवर शूटिंगमधून वेळ मिळताच जी गोष्ट तिला आवडते त्या गोष्टीचे वेगवेगळ्या अँगलने फोटो काढत असते.त्यामुळेच एरिकाला फोटो काढायची खूप आवड असल्याचे तिचे सहकलाकार सांगतात.नुकतेच एरिकाने एक कार्टुनचा मास्क चेह-याला लावत, कॉफी मग आणि मोबाईल चार्जरसह वेगवेगळ्या अँगलने क्लिक केलेले फोटो सोशलमीडियावर शेअर केले आहेत.




तिच्या या फोटोंना तिचे चाहते ही भन्नाट कमेंट देत आहेत.एरव्ही मालिकेच्या सेटवर जेव्हा जेव्हा एरिकाचा मेकअप पूर्ण होतो तेव्हा एक तरी सेल्फी ती काढते.त्यामुळे तिला आता सेल्फी क्विन म्हणूनही तिचे सहकालाकार चिडवत असतात. सध्या तिचा मालिकेत नवीन मेकओव्हर करण्यात आला आहे त्यामुळे तिचे फोटोसेशन हे सुरूच असते. एरिकासह देव म्हणजेच  शाहिर शेखचाही नवीन मेकओव्हर करण्यात आला आहे. त्यामुळे देवचेही वेगवेगळे फोटो एरिका क्लिक करत असते. लीप घेत मालिका 7 वर्षानी पुढे गेली आहे. मालिकेत आलेले नवीन बदल रसिकांनाही आवडतायेत. यापूर्वीही मालिकेत देव आणि सोनाक्षीचा रोमँटीक अंदाजही रसिकांना भावला होता. आता या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला असून या दोघांमधले उडणारे खटकेही रसिकांच्या पसंतीस उतरताना दिसतायेत. 

Web Title: Fame Erica Fernandes also liked photography as 'some color loving' too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.