फैसल रशिद स्वत:ला शाहरूख नाही तर समजतो आमिर खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2017 14:35 IST2017-04-10T09:05:20+5:302017-04-10T14:35:20+5:30
'हर मर्द का दर्द'मध्ये अभिनेता फैसल रशिदसोबत गुजराती अभिनेत्री झिनल बेलानी यांना छान प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच पार्टी न ...

फैसल रशिद स्वत:ला शाहरूख नाही तर समजतो आमिर खान
' ;हर मर्द का दर्द'मध्ये अभिनेता फैसल रशिदसोबत गुजराती अभिनेत्री झिनल बेलानी यांना छान प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच पार्टी न करता कामाला प्राथमिकता दिल्याबद्दल फैसलच्या नावाची चर्चा होती.कामावरील त्याची निष्ठा पाहून या शोच्या कलाकारांनी त्याची तुलना आमिर खानसोबत केली आहे.बॉलिवूडमध्ये मि.परफेक्शनिस्ट म्हणून आमिर खानला ओळखले जाते. दरवर्षी एक से एक ब्लॉकबस्टर्स देऊनही कुठल्याही पुरस्कार समारंभ किंवा पेज ३ पाट्र्यांमध्ये आमिर दिसत नाही.“फैसल मला नेहमीच माझे सीन्स सुधारण्यासाठी मदत करतो. तो हुशार आहे आणि नेहमीच इतर गोष्टीत जास्त वेळ न घालवता आपल्या कामावरच तो लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे आम्ही सारेच सेटवर त्याला आमिर खान म्हणून आवाज देत असतो. त्याच्यात आमिर खानप्रमाणेच गुण पाहायला मिळतात.आमिर खानप्रमाणेच तो ही कुठल्याही पार्टी किंवा सेलिब्रेशनसाठी येत नाही.” असे झिनल बेलानी म्हणाली.काही दिवसांपूर्वी फैजल शाहरूख खानच्या प्रेमात पडला होता. रबने बना दी जोडीमध्ये शाहरुख आपली पत्नी अनुष्का शर्माचे मन जिंकण्यासाठी मेकओव्हर करतो अगदी त्याचप्रमाणे मालिकेतील एका सीनसाठी फैजलने शाहरूख सारखा मेकअोव्हर केला होता.त्यावेळी मी शाहरुख खानचा मी खूप मोठा फॅन असल्याचे त्याने म्हटले होते.तसेच ‘हर मर्द का दर्द’ ही मालिका सुरू होण्यापूर्वी प्रोमोमध्येही फैसलने 'ओम शांती ओम' सिनेमातील शाहरूख प्रमाणेच मेकओव्हर केला होता. सिनेमात ज्याप्रमाणे शाहरूखने रेट्रो लुक केला होत्या अगदी त्याचप्रमाणे त्यावेळी फैसल पाहायला मिळाला होता.त्यामुळे यावरून तीही फैसल हा शाहरूखचा मोठा फॅन असल्याचे समजते. याव्यतिरिक्त फैसल मालिकेच्या सेटवर केवळ उत्तम अभिनेता म्हणूनच ओळखला जात नाही, तर तो उत्तम चहा बनवतो, त्यामुळे सेटवर उत्तम चहावाला असेही चिडवले जाते.