एजाज खानने मोह मोह के धागे या मालिकेसाठी वाढवले 10 किलो वजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 18:58 IST2017-03-22T13:28:18+5:302017-03-22T18:58:18+5:30
एजाज खानने कही तो होगा या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर केसर, कुसूम, क्योंकी साँस भी कभी बहू ...

एजाज खानने मोह मोह के धागे या मालिकेसाठी वाढवले 10 किलो वजन
ए ाज खानने कही तो होगा या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर केसर, कुसूम, क्योंकी साँस भी कभी बहू थी, काव्यांजली यांसारख्या मालिकांमध्ये तो झळकला. तो गेल्या वर्षी मेरी आवाज ही पहचान है या मालिकेत झळकला होता. तसेच त्याने मोठ्या पडद्यावरही आपले नशीब आजमावले आहे. त्याने कुछ ना कहो, तनू वेड्स मनू, तनू वेड्स मनू रिटर्न्स यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता तो कित्येक महिन्यांनंतर ये मोह मोह के धागे या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. या मालिकेत एजाजचे एक वेगळेच रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कारण या मालिकेसाठी एजाजने दहा किलो वजन वाढवले आहे.
एजाज मालिकांसोबतच चित्रपटांमध्येदेखील काम करत असल्याने त्याने ही मोठी रिस्क घेतली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कोणतेही कलाकार वजन कमी करण्यासाठी धडपड करत असतात. पण एजाजने या मालिकेसाठी वजन वाढवले आहे. याबाबत एजाज सांगतो, "या मालिकेत मी साकारत असलेली मुखी ही व्यक्तिरेखा ही अतिशय वेगळी आहे. या माणसाला तरुणपणातच अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागल्या आहेत. त्यामुळे तो त्याच्या वयापेक्षा मोठा दिसणे आवश्यक होते. तसेच तो गावात राहातो असे दाखवण्यात आले आहे आणि गावातील पुरुष कधीच एकदम बारीक नसतात, ते नेहमीच पिळदार दिसतात. त्यामुळे मी वजन वाढवायचे ठरवले आणि त्यातही वजन वाढवण्यासाठी मी खूप खूश होतो. कारण यामुळे मला माझ्या आवडत्या गोष्टी मनसोक्त खाता आल्या. मला गोड पदार्थ खूप आवडतात. जिलेबी, गुलाबजाम, चॉकलेट यांचा तर मी फॅन आहे. पूर्वी मला या गोष्टी खाताना अनेकवेळा विचार करावा लागत असे. पण आता मी माझ्या आवडत्या पदार्थांवर आनंदाने ताव मारतो."