Exclusive : सरस्वती या मालिकेत आस्ताद काळे परतणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 15:43 IST2017-05-17T09:08:35+5:302017-05-17T15:43:48+5:30
सरस्वती या मालिकेत आस्ताद काळेने राघव ही भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना त्याची ही भूमिका प्रचंड आवडली होती. या मालिकेतील ...
.jpg)
Exclusive : सरस्वती या मालिकेत आस्ताद काळे परतणार
स स्वती या मालिकेत आस्ताद काळेने राघव ही भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना त्याची ही भूमिका प्रचंड आवडली होती. या मालिकेतील राघव आणि सरस्वती यांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. पण काही दिवसांपूर्वी आस्ताद काळेने या मालिकेचा निरोप घेतला. या मालिकेत राघवचा मृत्यू झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते.
राघव आणि सरस्वती काही दिवसांपूर्वी दुबईला गेले होते. लग्नानंतर पहिल्यांदाच ते दोघे बाहेर गेल्यामुळे त्यांच्यासाठी ही ट्रीप खूप महत्त्वाची ठरली होती. या दोघांनी अनेक अविस्मवरणीय क्षण दुबईत घालवले. त्या दोघांनी दुबईतील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. त्याचसोबत खूप सारी शॉपिंग देखील केली होती. दुबईला गेल्यापासून राघव सरस्वतीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता. तसेच आपले तिच्यावरचे प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी तो सोडत नव्हता. राघवने तिच्यासाठी तिथे एक रोमँटिक गाणेदेखील गायले होते. पण याच ट्रीपमध्ये सदाशिव त्यांच्या दोघांचा पाठलाग करत होता. सरस्वतीला मारण्याच्या हेतून तो दुबईला आला होता आणि त्याने राघववर हल्ला केला होता आणि या हल्ल्यात राघवचा मृत्यू झाला होता असे आपण काहीच दिवसांपूर्वी पाहिले आहे. पण प्रेक्षकांना एक सुखद धक्का बसणार आहे. कारण प्रेक्षकांचा लाडका राघव आता मालिकेत परतणार आहे.
आस्ताद काळेची मालिकेत पुन्हा एंट्री होणार असून त्याच्या एंट्रीनंतर मालिकेच्या कथानकाला चांगलाच ट्विस्ट मिळणार आहे. कारण काहीच दिवसांपूर्वी मालिकेत रणजीत या व्यक्तिरेखेची एंट्री झाली आहे. ही भूमिका हरिश दुधाडे साकारत असून रणजीत सरस्वतीच्या प्रेमात पडला आहे. त्यामुळे राघव परतल्याने मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळणार आहे.