मिताली नागच्या मुलाचा सेटवर सगळ्यांना लागला लळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 15:48 IST2018-06-06T10:04:06+5:302018-06-06T15:48:15+5:30

कलर्सवर रुप-मर्द का नया स्वरुपमध्ये आदर्श पुरूषाची व्याख्या बदलण्यात आली आहे. 28 मे पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली ...

Everyone at Mitali Nag's child's set | मिताली नागच्या मुलाचा सेटवर सगळ्यांना लागला लळा

मिताली नागच्या मुलाचा सेटवर सगळ्यांना लागला लळा

र्सवर रुप-मर्द का नया स्वरुपमध्ये आदर्श पुरूषाची व्याख्या बदलण्यात आली आहे. 28 मे पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बेटी को बेटा बनाओ या विचारा ऐवजी बेटे को बेटी जैसा बनाओ हा विचार या शो मधून देण्यात येतो आहे आणि त्यात रुप (अफान खान) या 8 वर्षांच्या मुलाचा प्रवास दाखविण्यात येतो आहे. कमलाची (रुपची आई) भूमिका साकारणाऱ्या मिताली नागला नुकताच काही महिन्यांपूर्वी एक मुलगा झालेला आहे आणि त्याचे नाव रुद्रांश आहे. तिला नेहमीच लहान मुले आवडतात आणि त्यामुळे आईपण हा तिला आशीर्वाद वाटत आहे. व्यस्त वेळापत्रक असून सुध्दा ही सुपरमॉम मिताली नाग सेटवर तिच्या मुलाला रोज घेऊन येते. तिची पडद्यावरील मुले जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रुद्रांशशी खेळायला उत्सुक असतात, विशेषतः अफान खानचे त्याच्याशी विशेष बंध जुळले आहेत. 

मिताली नाग म्हणाली, “रुद्रांशला एखाद्या डेकेअर मध्ये सोडणे माझ्यासाठी अवघड आहे कारण तो अजून खूप लहान आहे. मला सेटवर त्याला थोडातरी वेळ देता येतो आणि माझी प़द्यावरील मुलांनाही त्याच्या आसपास असणे खूप आवडते. रविवारी माझे पती त्याची काळजी घेतात कारण त्यांना त्या दिवशी सुट्टी असते. खरेतर मला नॅनी पेक्षा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडे त्याला सोडायला आवडले असते. कारण मला वाटते की कुटुंबातील इतर सदस्यांसारखे प्रेम आणि काळजी नॅनी घेऊ शकत नाही. मी लहान असताना माझी काळजी घेणारी माझी मासी मला रुद्रांशची देखभाल करण्यात मदत करते. सेटवर माझी प्रॉडक्शन टीम अतिशय साहाय्यकारी आहे. ते मला त्याच्या सोबत राहू देतात आणि मी चित्रीकरणात असले आणि तो रडत असेल तर ते त्याला शांत करतात.”

या मालिकेत यश टोंक मुख्य भूमिका साकारत आहे. आपल्या भूमिकेविषयी सांगताना यश म्हणाला होता की, "रुप-मर्द का नया स्वरुप या मालिकेची संकल्पना अतिशय वेगळी आहे आणि माझे पात्र एक पुरूष असल्याच्या सर्व वैशिष्ट्यां विषयी आपल्याला विचार करायला लावते. मर्दानीपणाचा अभिमान असलेला एक दरोगा शमशेर सिंह कोणालाही उत्तर देत नाही आणि पुरूषीपणाचे चिन्ह म्हणून ताकतीचे प्रदर्शन करतो. पण, मी या देशातील सर्व पुरूषांना विनंती करतो की स्त्रियांना सुद्धा पुरूषांसारख्याच भावना आणि महत्वाकांक्षा असतात हे जाणून घ्या आणि आम्ही त्या सुद्धा समाजाचा एक समान हिस्सा आहेत हे कबूल केले पाहिजे

Web Title: Everyone at Mitali Nag's child's set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.