ट्रेलरवर सगळेच फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 17:49 IST2016-09-28T05:08:37+5:302016-10-04T17:49:57+5:30
निखिल अडवाणीची पीओडब्ल्यू -बंदी युद्ध के ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. निखिलने कल हो ना हो, सलामे इश्क यांसारख्या ...
ट्रेलरवर सगळेच फिदा
न खिल अडवाणीची पीओडब्ल्यू -बंदी युद्ध के ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. निखिलने कल हो ना हो, सलामे इश्क यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे त्याच्या मालिकेची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. या मालिकेचा ट्रेलर केवळ सामान्य लोकांनाच नव्हे तर बॉलिवुड कलाकारांनाही प्रचंड आवडत आहे. सोनम कपूर, करण जोहर, दिया मिर्झा, रितेश देशमुख, सुनील शेट्टी यांसारख्या कलाकारांनीही या मालिकेच्या ट्रेलरचे कौतुक केले आहे. आपल्या मुलांना युद्धात वीरगती मिळाली आहे असे सैनिकांच्या कुटुंबातील लोक समजत असतात. पण 17 वर्षांनंतर त्यातील दोन सैनिक अचानकपणे आपल्या घरी परतात. त्यानंतर काय होते याची कथा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत संध्या मृदूलची प्रमुख भूमिका आहे. संध्याने कोशिश एक आशा, आशीर्वाद यांसारख्या मालिकेत तर पेज 3 या चित्रपटात काम केले आहे.