नोकरीला रामराम करून एतशा संझगिरी झाली 'छोटी मालकीण'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 10:28 IST2018-03-19T04:58:57+5:302018-03-19T10:28:57+5:30
नाटक, चित्रपट, अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, चांगली चाललेली नोकरी सोडून एक तरुणी अभिनेत्री होण्यासाठी धडपड करते... तिचे नशीबही तिला ...
नोकरीला रामराम करून एतशा संझगिरी झाली 'छोटी मालकीण'
न टक, चित्रपट, अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, चांगली चाललेली नोकरी सोडून एक तरुणी अभिनेत्री होण्यासाठी धडपड करते... तिचे नशीबही तिला साथ देते… स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या नव्या मालिकेत प्रमुख भूमिका करण्याची सुवर्ण संधी तिला मिळते आणि तिचे छोट्या पडद्यावर भव्य पदार्पणही होते... ही प्रेरणादायी कथा आहे 'छोटी मालकीण' एतशा संझगिरीची! स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या नव्या मालिकेत एतशा 'रेवती' ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहे. एतशाने सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर ती नोकरीही करत होती. मात्र, नोकरीत काही मन रमत नव्हते. कथ्थकचे शिक्षण घेत असल्याने परफॉर्मन्सची भीती वाटत नव्हती. अशातच तिच्या समोर संधी चालून आली ती एका सौंदर्य स्पर्धेची. त्यात तिची अंतिम फेरीसाठी निवड झाली. तिला एक पुरस्कारही मिळाला आणि तिचे नशीब पालटले. दशमी क्रिएशन्सने तिला हेरले आणि 'छोटी मालकीण' या नव्या मालिकेसाठी तिची निवड झाली. पहिल्याच मालिकेत तिला डॉ. गिरीश ओक, वंदना वाकनीस, अक्षर कोठारी, निखिल राजेशिर्के, प्रदीप पंडित, प्रतीक्षा जाधव, पूजा नायक अशा अनुभवी कलाकारांसह काम करण्याची संधी मिळाली आहे.
आपल्या भूमिकेविषयी एतशा संझगिरी सांगते, "माझ्यासाठी हा सगळाच प्रवास अद्भुत आहे. कारण, मला अभिनयाची, नाटकाची, चित्रपटाची कसलीच पार्श्वभूमी नाही. घरी कुणीही या क्षेत्रात नाही. नोकरी करणारी मुलगी ते अभिनेत्री हा जेमतेम एका वर्षात घडलेला प्रवास आहे. या सगळ्यात माझ्या आई-वडिलांनी मला खंबीर पाठिंबा दिला. आजपर्यंत स्टार प्रवाहच्या मालिका मी पाहात होते. आता त्याच चॅनेलवर आपण दिसणार याचा आनंद खूपच प्रचंड आहे,
छोटी मालकीण म्हणजेच 'रेवती' या व्यक्तिरेखेच्या काही छटा माझ्याशी मिळत्याजुळत्या आहेत. तसेच मालिकेची कथाही मला खूप आवडली. त्यामुळे ही मालिका करावीशी वाटली. अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्टार प्रवाह. स्टार प्रवाहने कायमच नव्या कलाकारांना संधी दिली आहे. पहिल्याच मालिकेत एवढ्या मोठ्या चॅनेलसह, डॉ. गिरीश ओक, वंदना वाकनीस, अक्षर कोठारी, अशा दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम करण्याची संधी मिळणे स्वप्नवत आहे. मला हा महत्वपूर्ण ब्रेक दिल्यामुळे मी स्टार प्रवाहची ऋणी आहे. आमची निर्मिती संस्था दशमी क्रिएशन्सनेही मला सांभाळून घेतले. मला खात्री आहे, 'छोटी मालकीण' प्रेक्षकांना नक्की आवडेल."
मोठ्या घरातल्या लाडावलेल्या मुलीची गोष्ट असलेली 'छोटी मालकीण' ही मालिका १९ मार्चपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Also Read : 'छोटी मालकीण' या मालिकेतील अक्षर कोठारीचा लूक तुम्ही पाहिला का?