'एल्विश भाई राम-राम', तुरुंगात जाताच कैद्यांनी युट्यूबरला दिली अशी वागणूक, झालेला चकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:42 IST2025-05-27T12:41:41+5:302025-05-27T12:42:11+5:30
Elvish Yadav : काही दिवसांपूर्वी एल्विशला एका पार्टीत सापाचे विष पुरवल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. एल्विश तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने एका मुलाखतीत तुरुंगात राहण्याचा अनुभव सांगितला.

'एल्विश भाई राम-राम', तुरुंगात जाताच कैद्यांनी युट्यूबरला दिली अशी वागणूक, झालेला चकीत
युट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) अनेकदा चर्चेत येत असतो. बिग बॉस ओटीटी २ (Bigg Boss OTT 2) जिंकल्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला होता. तो आता अनेक रिएलिटी शोमध्ये दिसतो. काही दिवसांपूर्वी एल्विशला एका पार्टीत सापाचे विष पुरवल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. एल्विश तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने एका मुलाखतीत तुरुंगात राहण्याचा अनुभव सांगितला. कैद्यांनी त्याला कशी वागणूक दिली, याबद्दल त्याने सांगितले.
एल्विश यादवने एका मुलाखतीत सांगितले की, सुरुवातीला मला विश्वासच बसत नव्हता की मी तुरुंगात आलो आहे. जेव्हा मी आत गेलो तेव्हा स्कॅनिंग करण्यात आले. मी न्यायालयीन कोठडीत होतो. म्हणजे मी पूर्णपणे सुरक्षित असेल. मला काहीही होऊ नये ही पोलिसांची जबाबदारी असेल. एल्विश पुढे म्हणाला की, जेव्हा आम्ही तपासणीनंतर गेलो तेव्हा पहिल्या दिवशी काय होते. तिथे वेगळा सेल नाही, क्वारंटाइन वॉर्ड आहे. त्यात २००-२५० कैदी आहेत. त्यांच्या गाद्या त्यात ठेवलेले असतात. कैदी काम करत आहेत, पाहत आहेत. त्यापैकी एक म्हणाला, अरे एल्विश भाई, राम-राम. मी म्हणालो, भाई, तो मलाही ओळखतो. तो कुठून पाहतो मला.
मला फ्रीमध्ये मिळाला फॅन्टा
एल्विश पुढे म्हणाला की, आतील कैदी २-३ मोठ्या केसेसमध्ये अडकले होते. पहलवानासारखे होते आणि एल्विश भाई ठीक आहेस. ते माझे मित्र बनले. आत एक कैदी फॅन्टा विकत होता. तिथे सामान महाग आहे. त्याने फॅन्टा मोफत दिला. तो म्हणाला, स्वागत आहे एल्विश भाई.
वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, एल्विश यादव सध्या लाफ्टर शेफ्स २ मध्ये स्वयंपाक करताना आणि लोकांना हसवताना दिसत आहे. याशिवाय, तो रोडीजमध्ये एका गँग लीडर म्हणूनही दिसत आहे. प्रेक्षकांना एल्विश खूप आवडतो.