'एक महानायक डॉ. बी.आर.आम्‍बेडकर' मालिकेने गाठला ३०० एपिसोड्सचा सुवर्ण टप्‍पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 15:38 IST2021-05-27T15:31:27+5:302021-05-27T15:38:11+5:30

भारताचे सर्वात प्रेरणादायी नेते डॉ. बी. आर. आंबेडकर यांची अभूतपूर्व जीवनकथा सादर करत लाखो भारतीयांची मने जिंकली आहेत.

Ek Mahanayak Dr. BR Ambedkar Serial Completes 300 Successful Episodes | 'एक महानायक डॉ. बी.आर.आम्‍बेडकर' मालिकेने गाठला ३०० एपिसोड्सचा सुवर्ण टप्‍पा

'एक महानायक डॉ. बी.आर.आम्‍बेडकर' मालिकेने गाठला ३०० एपिसोड्सचा सुवर्ण टप्‍पा

डिसेंबर २०१९ मध्‍ये सुरू झालेली एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर' लक्षवेधक पटकथेसह प्रतिभावान स्‍टार कलाकारांमुळे प्रेक्षकांमध्‍ये लोकप्रिय ठरली आहे. मालिकेने हिंदी जीईसीमध्‍ये पहिल्‍यांदाच भारताचे सर्वात प्रेरणादायी नेते डॉ. बी. आर. आंबेडकर यांची अभूतपूर्व जीवनकथा सादर करत लाखो भारतीयांची मने जिंकली आहेत. 

 

या मालिकेच्‍या ३००व्‍या एपिसोडमध्‍ये भीमराव (आयुध भानुशाली) यांचा शिक्षणासाठी अविरत लढा पाहायला मिळण्‍यासोबत 'पढाई मेरा अधिकार है और पढाना शिक्षक का कर्तव्‍य है' हे तत्त्व पाहायला मिळेल. हा एपिसोड प्रेक्षकांना बाबासाहेबांचे मूलभूत तत्त्व – शिक्षणाचा अधिकार आणि शिक्षणामध्‍ये समानता यांची आठवण करून देईल.

३०० एपिसोड्स पूर्ण झाल्‍याचा आनंद व्‍यक्‍त करत आयुध भानुशाली ऊर्फ भीमराव म्‍हणाले, ''मालिका 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर'चे सर्व कलाकार व टीमचे मन:पूर्वक अभिनंदन! भीमरावांच्‍या भूमिकेने मला प्रचंड ओळख व प्रशंसा मिळवून दिली आहे आणि घराघरामध्‍ये लोकप्रिय बनवले आहे. चांगले वाटण्‍यासोबत अशा प्रेरणादायी नेत्‍याच्‍या तरूणपणाची भूमिका साकारण्‍याचा अभिमान वाटतो.'' शुभेच्‍छा देत जगन्‍नाथ निवंगुणे ऊर्फ रामजी सकपाळ म्‍हणाले, ''मालिका प्रबळ कथानक व पात्रांसह नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करत आहे. 

प्रत्‍येक सुवर्ण टप्‍पा आमच्‍यासाठी अभिमानास्‍पद व प्रशंसनीय क्षण आहे. रामजींची भूमिका साकारताना मला देशाच्‍या विविध भागांमधील प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम, लोकप्रियता व प्रशंसा मिळाली आहे. ही भूमिका सर्व वडिलांसाठी उत्तम प्रेरणास्रोत आहे. सर्व संकटांदरम्‍यान भीमरावांना रामजी यांच्‍याकडून मिळालेला पाठिंबा व साह्य अपवादात्‍मक होते आणि ते त्‍यांच्‍या मुलाची काळजी घेण्‍याप्रती खूपच कटिबद्ध होते. मला 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर'च्‍या प्रतिभावान टीमचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे. 

रामजींच्‍या भूमिकेमुळे मी एक कलाकार म्‍हणून सर्वसमावशेक बनलो आहे आणि माझ्या करिअरसाठी ही भूमिका खूपच खास राहिली आहे.'' बालाची भूमिका साकारणारे सौद मन्‍सुरी म्‍हणाले, ''आमच्‍या मालिकेने विभिन्‍न वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षून घेण्‍यासोबत त्‍यांच्‍या मनामध्‍ये मिळवलेले स्‍थान पाहून अभिमान वाटण्‍यासोबत खूपच आनंद होत आहे. बाबासाहेब त्‍यांच्‍या काळामध्‍ये अग्रस्‍थानी होते आणि त्‍यांची तत्त्वे व विचारसरणींचा आपल्‍यावर विविध प्रकारे प्रभाव पडला आहे. मी ३०० एपिसोड्सचा टप्‍पा गाठण्‍यासाठी सर्व कलाकार व टीम, तसेच प्रेक्षकांचे अभिनंदन करतो. अशा स्‍वरूपाच्या मालिका निर्मितीसाठी घेण्‍यात आलेली अथक मेहनत व प्रयत्‍नांचे कौतुक आणि साजरे करण्‍याचे आम्‍हाला आणखी एक कारण मिळाले आहे.'' 

मीराबाईची भूमिका साकारणा-या फाल्‍गुनी दवे म्‍हणाल्‍या, ''उल्‍लेखनीय व प्रभावी पटकथेसह प्रबळ पात्रांसाठी प्रचंड प्रेम व प्रशंसा मिळालेल्‍या मालिकेचा भाग असण्‍याचा मला आनंद होत आहे. मी आगामी काळामध्‍ये अशा प्रकारचे अनेक सुवर्ण टप्‍पे गाठण्‍यास उत्‍सुक आहे. मी मालिका 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर'च्‍या यशासाठी संपूर्ण टीमचे अभिनंदन करते. आज भारतीय टेलिव्हिजनवरील ही सर्वात उल्‍लेखनीय मालिका आहे आणि या मालिकेचा भाग असण्‍याचा आम्‍हा सर्वांना अभिमान वाटतो.''
 

Web Title: Ek Mahanayak Dr. BR Ambedkar Serial Completes 300 Successful Episodes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.