“अंडे का फंडा” खेळादरम्यान सईला का कोसळले रडू ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 11:21 IST2018-05-30T05:51:24+5:302018-05-30T11:21:24+5:30

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले “अंडे का फंडा” हे साप्ताहिक कार्य. खेळाच्या या आठवड्यामध्ये बिग बॉस ...

"Egg Fund" During the game, why does the tears of weeping? | “अंडे का फंडा” खेळादरम्यान सईला का कोसळले रडू ?

“अंडे का फंडा” खेळादरम्यान सईला का कोसळले रडू ?

र्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले “अंडे का फंडा” हे साप्ताहिक कार्य. खेळाच्या या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरातील सर्व सदस्य असणार आहेत कॅप्टनसीचे उमेदवार. ही कॅप्टनसीची दावेदारी कोणत्या सदस्यांना मिळणार ? हे लवकरच कळेल. कॅप्टनसीमुळे मिळणारी इम्युनिटी पुढे जाण्यासाठी खूप महत्वाची असते. या कार्यामध्ये यशस्वी ठरणे म्हणजे थेट नवव्या आठवड्यामध्ये पोहचणे. तसेच इतर सदस्यांकडून ही इम्युनिटी हिसकावून घेण्याची सुवर्णसंधी देखील बिग बॉस यांनी सदस्यांना काल दिली. आज देखील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “अंडे का फंडा” हे कार्य रंगणार आहे. काल सुशांत आणि रेशम यांच्या नावाचे अंडे सुरक्षित करण्यामध्ये ते यशस्वी झाले होते, तर मेघा आणि जुईचे नाव असलेले अंडे नष्ट करण्यात आले होते. आज सदस्य कोणाच्या नावाचे अंडे नष्ट करणार ? पुष्कर, उषा नाडकर्णी, सई, शर्मिष्ठा अशा इतर सदस्यांच्या नावाची अंडी त्यांचे समर्थक आणि ते सुरक्षित करू शकतील का ? हे बघणे रंजक असणार आहे.  

“अंडे का फंडा” या साप्ताहिक कार्यामध्ये आज स्मिताचे पुष्कर आणि आस्ताद बरोबर बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये त्यांची कार्याला घेऊन बरीच बाचाबाची झाली आहे. तसेच या कार्या दरम्यान सईला का रडू कोसळले ? हे देखील कळणार आहे. काल बिग बॉस यांनी दिलेल्या आदेशावरून आज फक्त मानवी साखळीचा वापर करून सदस्याच्या नावाचे अंड समर्थकांनी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण, काल अंडे एका फंडा या कार्यादरम्यान सदस्य शक्ती प्रदर्शन करताना दिसले ज्यावरून बिग बॉस यांनी सदस्यांना सक्त ताकीद दिली कि, हा प्रकार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अमान्य आहे.

Web Title: "Egg Fund" During the game, why does the tears of weeping?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.