या कारणामुळे 'नागार्जुन एक योध्दा' मालिकेतील कलाकार पडला आजारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 10:11 IST2016-12-12T18:10:29+5:302016-12-13T10:11:31+5:30

अनेकदा कलाकार मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने त्यांना त्यांच्या कुटूंबापासून लांब रहावे लागते.जवळचे कोणीही नसल्यामुळे त्यांना सतत एकटेपणाही वाटत असतो. हाच ...

Due to this reason the artist of 'Nagarjuna Ek Yodda' series fell sick? | या कारणामुळे 'नागार्जुन एक योध्दा' मालिकेतील कलाकार पडला आजारी?

या कारणामुळे 'नागार्जुन एक योध्दा' मालिकेतील कलाकार पडला आजारी?

ेकदा कलाकार मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने त्यांना त्यांच्या कुटूंबापासून लांब रहावे लागते.जवळचे कोणीही नसल्यामुळे त्यांना सतत एकटेपणाही वाटत असतो. हाच  एकटेपणा कलकरांवर हावी झाल्याची अनेक उदाहरणे आपण ऐकली आहेत.असाच काहीसा प्रकार घडला आहे. 'नागार्जुन एक योध्दा' मालिकेतील पर्ल व्ही पुरीसोबत. कारण तो मानसिक तणावाखाली आल्यामुळे आजारी पडलाय. काही दिवासांपासून पर्ल हाणामारीच्या सीन्सचे शूटिंग करत होता.त्यामुळे त्याचा मानसिक तणाव वाढला होता.मालिकेच्या शूटिंग दरम्यानच त्याची तब्येत बिघडली, पर्लला श्वास घेण्यास त्रास होवू लागला.हृदयाची धडधड वाढत असल्याचे लक्षात येताच त्याला ताबोडतोब त्याला रूग्णालायत दाखल करण्यात आले. गेले काही आठवडे सतत ‘नागार्जुन- एक योध्दा’ मालिकेसाठी शूटिंग करत असून काही दिवसांपासूनच त्याला अशक्तपणाही जाणवत होता. परंतु तब्येतीकडे  दुर्लक्ष केलं. गेल्या काही दिवसांत ब-याच अ‍ॅक्शनसिक्वेन्सचे शूटिंग केल्याने तब्येत बिघडली असल्याचे पर्लला वाटतंय.मात्र त्याच्या आजारी पडण्याला आणखी एक कारण आहे.ते म्हणजे पर्ल मुंबईत एकटा राहत असून त्याची कुटुंबीय दिल्ली राहते. त्याचे जवळचे असे  कोणीही मुंबईत  राहत नसल्याने त्याला एकटेपणा वाटत होता.याविषयी पर्ल सांगतो,माझे आई-वडील दिल्लीत राहतात आणि मी इथे मुंबईत एकटा राहतो. त्यामुळे माझी काळजी घेण्यासाठी इथे कोणीही नाही. मला माझ्या घराच्यांची खूप आठवण येत होती आणि घरी जावंसं वाटत होतं. अभिनय करण्याच्या माझ्या निर्णयाशी माझे आई वडील सहमत नाहीत.त्यामुळे  गेल्या पाच वर्षांत फक्त एकदाच मी त्यांना भेटलो आहे. त्यामुळेच कदाचित  सतत कुटुंबियांचा  विचार करून मी आजारी पडलो असल्याचे पर्लने सांगितले.पुन्हा मानसिकदृष्ट्या खचु नये म्हणून  डिस्जार्ज मिळताच त्याच्या  कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणार असल्याचे पर्लने  सांगितले.

 

Web Title: Due to this reason the artist of 'Nagarjuna Ek Yodda' series fell sick?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.