अर्शी खानचे सेक्स स्कॅण्डल उघड करणाºया सपना चौधरीचाही प्रायव्हेट पार्टीतील व्हिडीओ झाला व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 18:47 IST2017-11-03T13:17:39+5:302017-11-03T18:47:39+5:30

काही दिवसांपूर्वीच सपना चौधरीने प्रियांक शर्माच्या सांगण्यानुसार अर्शी खानचे सेक्स स्कॅण्डल उघड केले होते. आता तिचाही एक कारनामा समोर येत आहे.

Dream video exposed by Arshi Khan's sex scandal also has a video of a viral virgin! | अर्शी खानचे सेक्स स्कॅण्डल उघड करणाºया सपना चौधरीचाही प्रायव्हेट पार्टीतील व्हिडीओ झाला व्हायरल!

अर्शी खानचे सेक्स स्कॅण्डल उघड करणाºया सपना चौधरीचाही प्रायव्हेट पार्टीतील व्हिडीओ झाला व्हायरल!

ग बॉस सीजन ११ मध्ये सहभागी झालेले स्पर्धक घरातील त्यांच्या तमाशापेक्षाही बाहेरील त्यांच्या कारनाम्यांमुळेच अधिक चर्चेत आहेत. एकीकडे शिल्पा शिंदे अन् विकास गुप्तामधील वाद बाहेरच्या दुनियेत चर्चिला जात असतानाच प्रियांक शर्मा आणि सपना चौधरीने उघड केलेल्या अर्शी खानच्या सेक्स स्कॅण्डलने बाहेरील जगतात खळबळ उडवून दिली आहे. मात्र आता सपना चौधरीचे काही कारनामे समोर आले असून, तिचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. सपना हरियाणाची रागिनी सिंगर आणि डान्सर आहे. गेल्या ‘वीकेण्ड का वार’मध्ये सलमान खानने सपनाला समजावून सांगताना अर्शीवर पर्सनल कॉमेण्ट करू नको, असे म्हटले होते. परंतु आता सपनाचेच प्रायव्हेट पार्टीतील काही व्हिडीओ व्हायरल होत असल्याने ती चर्चेत आली आहे. 



व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पार्टीत उपस्थित असलेली काही मंडळी सपनाला जोरदार नाचवित आहेत. तिच्यावर पैसे उधळताना तिच्यासोबत ठेकाही धरत आहेत. सपनाने पांढºया आणि केसरी रंगाचा सलवार सूट घातलेला आहे. डोक्यावर दुपट्टा बांधून सपना असा काही डान्स करीत आहे की, सगळेच तिच्यावर फिदा होत आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी डान्सिग करिअरला सुरुवात करणारी सपना सुरुवातीला छोट्या-मोठ्या पार्ट्यांमध्ये डान्स करीत होती. कदाचित हा व्हिडीओ तेव्हांचाच असावा. 



मात्र काहीही असो, सपनाचा हा कारनामा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच सपनाने प्रियांकच्या सांगण्यानुसार अर्शी खानचे ‘गोवा-पुणे’ कनेक्शन उघड केले होते. सपनाच्या या खुलाशामुळे अर्शी खान खूपच दु:खी झाली होती. परंतु आता सपना चौधरीच्या काही खासगी गोष्टी समोर आल्याने तीही चर्चेत आली आहे. 

Web Title: Dream video exposed by Arshi Khan's sex scandal also has a video of a viral virgin!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.