अभिनेत्री मंजिरी फडणीसला करिअरच्या सुरूवातीला स्विकारावे लागले होते 'हे' आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 06:30 IST2019-04-26T06:30:00+5:302019-04-26T06:30:00+5:30

जेव्हा सेलिब्रिटी खाद्यपदार्थ चवीसाठी देत होते तेव्हा अर्जुन बिजलानी त्यांना कुकिंगच्या अनुभवाविषयी आणि त्यांच्या करियरच्या सुरूवातीला आलेल्या अडचणीं विषयी काही प्रश्न विचारत होता.

“Doing my own make-up was the biggest challenge during the initial days,” says Manjari Phadnis | अभिनेत्री मंजिरी फडणीसला करिअरच्या सुरूवातीला स्विकारावे लागले होते 'हे' आव्हान

अभिनेत्री मंजिरी फडणीसला करिअरच्या सुरूवातीला स्विकारावे लागले होते 'हे' आव्हान

छोट्या पडद्यावरील किचन चँपियन्स शोमध्ये मराठी मुलगी रेशम टिपणीस आणि मंजिरी फडणीस किचन चँपियनची शीर्षक ट्रॉफी मिळविण्यासाठी कुकिंग आव्हान स्विकारताना पहायला मिळणार आहेत. त्यांच्या सोबत असणार आहेत रेशमची आत्या आणि मंजिरीची आई, आणि त्या या एपिसोड मध्ये महाराष्ट्रीयन स्वाद आणणार आहेत.

'वाजले की बारा' या गाण्यावर उत्साहाने प्रवेश करत स्वादिष्ट खाद्यपदार्थ बनविण्या पर्यंत त्यांनी ज्युरी मुलांना प्रभावीत करण्याची एकही संधी सोडली नाही. जेव्हा सेलिब्रिटी खाद्यपदार्थ चवीसाठी देत होते तेव्हा अर्जुन बिजलानी त्यांना कुकिंगच्या अनुभवाविषयी आणि त्यांच्या करियरच्या सुरूवातीला आलेल्या अडचणीं विषयी काही प्रश्न विचारत होता. त्यांच्या मागील जीवनातील अनेक रहस्ये त्या दोघी सांगत असताना, मंजिरी फडणीसने सांगीतले की तिच्या सुरूवातीच्या करियर मध्ये मेकअप कसा करायचा हे तिच्या पुढचे सर्वात मोठे आव्हान होते.

तिचा अनुभव सांगताना, मंजिरी म्हणाली, माझ्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये मला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले कारण मला माझा मेकअप कसा करायचा हेच माहित नव्हते. मला आठवते, माझ्या एका ऑडिशनमध्ये दिग्दर्शकाने मला तोंड धूवायला सांगीतले होते कारण मी खूप जास्त मेकअप केला होता. त्यामुळे मला अभिनय करण्याआधी ग्रूमिंग कसे करायचे हे शिकावे लागले आणि त्यानंतर मी मेकअप कसा करायचा हे शिकण्याचे ठरविले.”

Web Title: “Doing my own make-up was the biggest challenge during the initial days,” says Manjari Phadnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.