टीव्ही इंडस्ट्रीत आपली विशेष ओळख निर्माण करण्याची रूबीना दिलाइकची अशीही धडपड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 16:55 IST2017-06-15T11:25:47+5:302017-06-15T16:55:47+5:30
संस्कारी बहू म्हणून भूमिका साकारणारी रूबीना सध्या खूप बोल्ड झाल्याचे पाहायला मिळतेय.

टीव्ही इंडस्ट्रीत आपली विशेष ओळख निर्माण करण्याची रूबीना दिलाइकची अशीही धडपड?
स ंदर्य आणि अभिनय क्षमतेच्या जोरावर टीव्ही इंडस्ट्रीत आपली विशेष ओळख निर्माण करण्याची धडपड सध्या रुबीना दिलाइक करतेय.'छोटी बहू' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुबीना दिलाइक पुन्हा एकदा तिच्या नवीन फोटोजमुळे चर्चेत आली आहे.रुबीना सध्या बालीमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. बालीमध्ये रूबीनाने नुकतेच एक हटके फोटोशुट केले आहे. निळ्या- हिरव्या रंगाचा लेहंगा परिधान केलेल्या फोटोशूटमध्ये रूबीनाचे व्यक्तिमत्व अधिक उठावदार दिसत असून, तिचा हा 'ग्लॅमरस' लुक तिच्या चात्यांसाठी देखील लक्षवेधी ठरत आहे. आतापर्यत विविधांगी भूमिकेतून लोकांसमोर आलेल्या रूबीना या ग्लॅमरस फोटोशूटला सोशल साईटवर भरभरून प्रतिसाददेखील मिळत असल्याचे दिसून येत आहे.आगामी काळात रूबीना वेगवेगळ्या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार असल्याची माहितीही मिळतेय. त्यामुळे आगामी भूमिकेत झळकण्याआधी तुर्तास तिचे हे फोटोशूट चाहत्यांच्या नजरा आकर्षित करण्यास यशस्वी ठरत आहे.रुबीना सध्या 'शक्ति: अस्तित्व के अहसास' या मालिकेत किन्नर (ट्रान्सजेंडर) च्या भूमिकेत दिसत आहे. 'छोटी बहू' 'सास बिना ससुराल' 'पुनर्विवाह' , 'देवों के देव...महादेव' आणि 'जीनी और जूजू' या मालिकांमध्येही ती झळकली होती.या मालिकांमध्ये छोट्या पडद्यार अगदी साडी वजनदार दागिने आणि संस्कारी बहू म्हणून भूमिका साकारणारी रूबीना सध्या खूप बोल्ड झाल्याचे पाहायला मिळतेय. काही दिवसांपूर्वीच रुबीना दिलाइकने इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे बिकनीत असलेले काही फोटो पोस्ट केले होते. हे फोटो रुबीनाचा बॉयफ्रेंड अभिनव शुक्लाने काढले होते. तेच फोटो सोशलमीडियावर शेअर करत रूबीनाने बॉयफ्रेंड अभिनव शुक्लाचे भरभरून कौतुकही केले होते. आता पुन्हा एकदा अभिनव शुक्लाकनेच तिचे हे फोटोशूट केले असल्यामुळे ती पुन्हा एकदा अभिनवचे गोडवे गाताना दिसतेय.