​तू सूरज मैं साँझ पियाजी या मालिकेतून नीलू वाघेला यांची एक्झिट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 13:59 IST2017-12-20T08:29:26+5:302017-12-20T13:59:26+5:30

स्टार प्लसवरील दिया और बाती हम ही मालिका चांगलीच गाजली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय असल्यामुळे या मालिकेचा पुढचा ...

Do you meet Neelu Vaghela from the series Sunaji Piazza? | ​तू सूरज मैं साँझ पियाजी या मालिकेतून नीलू वाघेला यांची एक्झिट?

​तू सूरज मैं साँझ पियाजी या मालिकेतून नीलू वाघेला यांची एक्झिट?

टार प्लसवरील दिया और बाती हम ही मालिका चांगलीच गाजली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय असल्यामुळे या मालिकेचा पुढचा भाग तू सूरज मैं साँझ पियाजी प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला. या मालिकेच्या कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय बनली आहे. या मालिकेत दिया और बाती हम या मालिकेतील काही कलाकार असून रिया शर्मा आणि अविनाश रेखी हे नवे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. कनक म्हणजेच अविनाश रेखी आणि उमा म्हणजेच रिया शर्मा यांच्याभोवती या मालिकेची कथा फिरत असून या मालिकेच्या कथानकाला नुकतीच कलाटणी मिळाली आहे. कनक आणि उमा यांच्यात घटस्फोट झाल्याचे नुकतेच मालिकेत दाखवण्यात आले आहे. या घटस्फोटाचा परिणाम या दोघांच्या नात्यावर होत असला, तरी या घटनेला निर्मात्यांनी ‘तनू वेडस मनू’ या चित्रपटातील कथेप्रमाणे वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. या मालिकेच्या कथानकाला नवी कलाटणी मिळत असून यापुढे मालिकेतील राठी परिवाराची भूमिका संपुष्टात येणार असल्याचे कळतेय. तसेच केवळ उमाशंकर आणि कनक राठी यांच्याभोवतीच या मालिकेचे कथानक फिरत राहील, असे मालिकेच्या टीमकडून सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे अभिनेत्री नीलू वाघेला यांची भूमिका संपुष्टात येणार आहे. नीलू वाघेला यांनी दिया और बाती हम या मालिकेत भाभोची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. नीलू तू सूरज मैं साँझ पियाजी या मालिकेचा देखील भाग आहेत हे कळल्यावर या मालिकेच्या फॅन्सना प्रचंड आनंद झाला होता. पण आता तू सूरज मैं साँझ पियाजी या मालिकेतून त्यांची एक्झिट होणार हे कळल्यावर त्यांच्या फॅन्सना नक्कीच धक्का बसणार आहे.  
कथानकाच्या मागणीसाठी आणि मालिकेत नव्या कलाकारांचा प्रवेश करता यावा यासाठी तू सूरज मैं साँझ पियाजी या मालिकेत आजीची भूमिका रंगवणाऱ्या नीलू वाघेला यांची भूमिका संपवण्यात येणार आहे. या बातमीला निर्मात्यांकडून अधिकृतरीत्या दुजोरा मिळालेला नसला तरी नीलू वाघेलांची मालिकेतून एक्झिट होणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

Also Read : थिएटरमुळे कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळतो- अभिनेत्री निलू वाघेला

Web Title: Do you meet Neelu Vaghela from the series Sunaji Piazza?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.