आईसोबत दिसणाऱ्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत राहतो लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 05:39 PM2024-06-15T17:39:35+5:302024-06-15T17:41:14+5:30

आईच्या वाढदिवसानिमित्त मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्याने त्याच्या बालपणीचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Do you know this little boy who is seen with his mother?, lives in a live-in relationship with the Marathmola actress. | आईसोबत दिसणाऱ्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत राहतो लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये

आईसोबत दिसणाऱ्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत राहतो लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये

कलाकार बऱ्याचदा सोशल मीडियावर आपल्या बालपणीचे फोटो शेअर करत असतात. बालपणीचे फोटो शेअर करून ते आठवणींना उजाळा देत असतात. सध्या एका अभिनेत्याच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. खरेतर या अभिनेत्याने आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर करत आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोतील अभिनेत्याला ओळखलंत का? हा अभिनेता महाराष्ट्रीयन नसला तरी मराठी कलाविश्वात काम करतो आहे. इतकेच नाही तर मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतो आहे. हा अभिनेता म्हणजे काहे दिया परदेश मालिकेतून घराघरात पोहचलेला ऋषी सक्सेना (Rishi Saxena).

अभिनेता ऋषी सक्सेनाने आईच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या बालपणीचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने फोटो शेअर करत लिहिले की, हॅप्पी बर्थडे मम्मा. भाईसाहेब, तू मस्त आहेस. एक वर्ष मोठी झाल्याबद्दल अभिनंदन. या फोटोत ऋषी खूपच क्युट दिसतो आहे. त्याच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. ते पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सच्या वर्षाव करत आहेत.

वर्कफ्रंट
ऋषी सक्सेनाच्या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केले. त्याने काहे दिया परदेस या मालिकेत काम केले होते. या मालिकेतून तो घराघरात पोहचला. सध्या तो आई कुठे काय करतो या मालिकेत काम करताना दिसतो आहे. मराठीशिवाय त्याने हिंदी मालिकेत काम केले आहे. तसेच त्याने फत्तेशिकस्त, पावनखिंड, सुभेदार, शेर शिवराज या चित्रपटात काम केले आहे. 

ईशा आणि ऋषी राहतात लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये
ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतात. २०१८ मध्ये, इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ईशासोबतचा फोटो पोस्ट करत ऋषीने रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर ईशा व ऋषी यांची पहिली भेट झाली होती. या पहिल्याच भेटीत ऋषीच्या शांत स्वभावावर ईशा भाळली होती. अर्थात पहिल्या भेटीत काहीही बोलणं झालं नव्हतं. यानंतर झी मराठी पुरस्कारांच्या निमित्ताने ईशा व ऋषी यांचं बोलणं सुरू झालं आणि ईशानेच ऋषीला कॉफीसाठी विचारलं. पुढे मैत्री बहरली आणि एकदिवस ही मैत्री प्रेमाच्या कबुलीपर्यंत आली. दोघे लग्न कधी करणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
 

Web Title: Do you know this little boy who is seen with his mother?, lives in a live-in relationship with the Marathmola actress.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.