गायिका पल मुच्छालची ही खास गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 17:48 IST2017-11-06T12:18:08+5:302017-11-06T17:48:08+5:30

व्हॉइस किड्सचा नवा सीझन प्रेक्षकांचे वीकएण्ड्स संगीतमय आणि सुरेल करण्यास सज्ज आहे. पलक मुछाल, हिमेश रेशमिया, शान, पापोन ही ...

Do you know this special story of singer moment? | गायिका पल मुच्छालची ही खास गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

गायिका पल मुच्छालची ही खास गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

हॉइस किड्सचा नवा सीझन प्रेक्षकांचे वीकएण्ड्स संगीतमय आणि सुरेल करण्यास सज्ज आहे. पलक मुछाल, हिमेश रेशमिया, शान, पापोन ही प्रशिक्षकांची फौज आणि लक्षवेधी स्पर्धक यांच्या जोरावर व्हॉइस किड्स अन्य रिअॅलिटी शोजना हलवून सोडणार अशी चिन्हे आहेत. संगीताचा प्रवास नुकताच सुरू झालेल्या छोट्या प्रतिभावंतांना प्रशिक्षक मार्गदर्शन करत आहेत. केवळ तेवढेच नाही, तर हे प्रशिक्षक शोदरम्यान एकमेकांची नक्कलही करताना दिसतील. अशाच एका संभाषणात या प्रशिक्षकांनी एकमेकांची गुपिते उघड करण्यास सुरुवात केली आणि हास्याची कारंजी उडू लागली. त्यानुसार, पलक मुछाल  स्वच्छतेबाबत खूपच काटेकोर आहे आणि म्हणून ती स्वत:च्या प्लेट्स आणि कटलरी सोबत घेऊन येते. ती शाकाहारी असल्याने तिच्या सेटमधील कटलरी कोणी घेतली तर चिडून जाते.कटलरी नीट धुतली जाते की नाही याबद्दल तिला नेहमी शंका वाटत राहते आणि म्हणून स्वच्छतेबाबत निश्चिंत राहण्यासाठी ती स्वत:ची कटलरी घेऊन येते,” असे सेटवरील एकाने उघड केले. ती वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करते, तेव्हाही स्वत:च्या प्लेट्स आणि कटलरी घेऊन जाते. आता स्वच्छतेबाबत एवढी  जागृक असेल, तर पलक स्पर्धकांच्या कामगिरीचे निकष किती कडक लावणार हा विचार सगळ्यांना पडला आहे.

भारताला आपला सर्वात प्रभावशाली युवा आवाज मिळवून देण्यासाठी आघाडीचा गायक आणि संगीतकार – हिमेश रेशमिया; हसतमुख आणि अद्वितीय प्रतिभेचा गायक शान, भावविभोर आवाजाचा गायक आणि संगीतकार पापोन आणि सर्वात तरुण प्रशिक्षक बनलेली गायिका पलक मुछल अशा चार जबरदस्त प्रशिक्षकांची साथ या पर्वाला लाभली आहे. 'व्हॉइस इंडिया किड्स'चे दुसरे पर्व ११ नोव्हेंबर  पासून  सुरू होणार आहे. दिव्यांग मुलांमधील प्रतिभेला संधी देण्यापासून ते भारताच्या दुर्गम भागांतील मुलांच्या आजवर कधीही ऐकिवात न आलेल्या संघर्षाचे कौतुक करण्यापर्यंतच्या कित्येक कहाण्या व्हाइस इंडिया किड्सच्या दुस-या पर्वातून उलगडणार असून भारतील प्रतिभावान युवा गायकांनी जपलेले त्यांची कला  पाहणे रंजक ठरणार आहे.  ७ ते १४ या वयोगटातील मुले आपल्या आवाजाच्या जोरावर प्रशिक्षकांना मंत्रमुग्ध होण्यास भाग पाडतील असे एक से बढकर एक परफॉर्मन्स सादर करताना झळकतील.  या सुंदर सांगितिक सफरीमध्ये या छोट्या गायकांचे दोस्त बनून प्रसिद्ध अभिनेता व सूत्रसंचालक जय भानुशाली व त्याचा साथीदार निहार गिते हे दोघे या कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहेत. बडे मियां आणि छोटे मियां म्हणावे अशी त्यांची  कामगिरीही आवर्जून पहावी अशीच असणार आहे.

 या कार्यक्रमाचा एक भाग बनल्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करताना हिमेश रेशमिया म्हणाला, द व्हॉइस इंडिया किड्स हा एक असा मंच आहे जिथे संगीताचे खरे सार शोधले जाते व ज्यातून अनेक प्रतिभावान मुलांना आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. मला स्वत:ला मुलांच्या सान्निध्यात राहणे खूप आवडते. त्यांच्याकडून मला सतत प्रेरणा मिळत असते. त्यांच्या निर्मळ मनांचे प्रतिबिंब त्यांच्या गाण्यातही उमटलेले दिसते. व्हॉइस इंडिया किड्सचा भाग असणे हा माझ्यासाठी चांगला अनुभव आहे आणि या नव्या विलक्षण संगीतसफरीवर निघण्याची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे. तर शान म्हणाला, जिथे यशाची शिडी चढण्यासाठी स्पर्धकांना आपल्या आवाजाची ताकद पुरेपूर सिद्ध करावीच लागते अशा एका कार्यक्रमामध्ये परतणे ही माझ्यासाठी नेहमीच आनंदाची बाब असते. व्हॉइस इंडिया हा कार्यक्रम माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे कारण त्यातून असे संगीत आणि आवाज लोकांसमोर येतो जो तुमच्या  हृदयाला भिडतो.या कार्यक्रमाचे इतके भाग पार पडले तरीही त्यात दिसून येणारा स्पर्धकांचा उत्साह आणि त्यांची प्रतिभा यात खंड पडलेला नाही आणि या पर्वामद्येही अशाच अलौकिक प्रतिभेचा अनुभव घेण्याची मी वाट पाहत आहे.

Web Title: Do you know this special story of singer moment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.